Margao Municipality: नाले, गटारे उपसा न करता पैसे लाटल्याचा साव्हियो कुतिन्हो यांचा आरोप

मडगावातील नगरपालिकेचे नाला, गटार उपशाकडे दुर्लक्ष
Margao municipality News
Margao municipality NewsDainik Gomantak

फातोर्डा: मडगाव नगरपालिका क्षेत्रातील नाले, गटारे उपसा न करता पैसे लाटण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप शॅडो कौन्सिलचे निमंत्रक साव्हियो कुतिन्हो यांनी आरोप केला असून मडगाव येथील ओल्ड मार्केटमध्ये असलेल्या नाल्याचा कचरा आहे, त्याच स्थितीत आहे. हा कचरा पालिकेतर्फे उचलला जात नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

Margao municipality News
Goa Weather Update: राज्यात जोरदार पावसाची शक्यता

साव्हियो म्हणाले, ओल्ड मार्केट येथील न्यायालयाच्या बाजूला असलेल्या नाल्यातील एक टोपलीभर सुद्धा उचलण्यात आला असल्याचे पाहणी केल्यानंतर दिसून येत असल्याचे म्हणाले. नगरपालिका, जल संसाधन खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग -६, हे सर्व जण नाले आणि गटारे साफ केली असल्याचे सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात काम केल्याचे येथे दिसत नाही. हा सर्व प्रकार पाहिल्यावर लाखो रुपयांची बिले देऊन पैसे लाटण्याचे प्रकार आहे. ही सर्वांची मिली भगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Margao municipality News
Pratima Coutinho: नावेलीतील अंगणवाड्यांची अवस्था भयानक

ओल्ड मार्केट येथे नाल्या जवळ राहत असलेल्या एका स्थानिकाने सांगितले. या ठिकाणी कोणी कधी कसलेच काम केल्याचे आम्ही पाहिले नाही. येथील नाल्यात दहा वर्षांपासून कसलेच काम करण्यात आलेले नाही. या पावसात हा नाला तुडुंब भरून आमच्या घरात पाणी येण्याचा प्रकार घडला आहे. गांधी रोड जवळील रहिवाशाने ही येथील गटारे साफ करण्यात आल्याच्या सांगण्यात येत असल्याबद्दल हरकत घेतली. या ठिकाणी साफ करण्यासाठी गटारे आहेत, तरी कुठे हे सांगत असलेल्यांची दाखवून द्यावे, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com