Cortalim ZP: कुठ्ठाळीत अपक्ष उमेदवार विजयी; गुलाल मात्र भाजपचाच

कुठ्ठाळीत आरजी दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर
Cortalim Zilla Panchayat by-election
Cortalim Zilla Panchayat by-electionDainik Gomantak

वास्को: कुठ्ठाळी जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार मेर्सियाना वास 3164 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. आरजीचे अपक्ष उमेदवार लेसली गामा 1511 मते प्राप्त करून दुसऱ्या स्थानी तर काँग्रेसचे उमेदवार वालेंट बारबो झा 1360 मते प्राप्त करून तिसऱ्या स्थानावर राहिले.

(Cortalim Zilla Panchayat by-election independent candidate Merciana Vas won by 3164 votes)

Cortalim Zilla Panchayat by-election
Goa Police: गोव्यातील चोपडे पुलावरुन उडी घेतलेल्याचा शोध लागेना!

कुठ्ठाळीत भाजपने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार मेर्सियाना वास विजयी झाल्या. त्या कुठ्ठाळीचे आमदार आंतोनिया वास यांच्या पत्नी आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली असली तरी त्यांना भाजपने पाठिंबा दिलेला आहे.

Cortalim Zilla Panchayat by-election
Goa Accident Cases: गोव्यातील अपघातांचे प्रमाण कमी होईना!

दुसऱ्या क्रमांकावर आरजीचे उमेदवार लेसली गामा यांना 1511 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार वालेंत बारबोझा यांना 1360 मते मिळाली. तर सर्वात कमी मते आपचे उमेदवार जॉन डीसा यांना 293 मते मिळाली. डिसा यांना कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना सल्डाणा यांनी पाठिंबा दिला होता. कुठ्ठाळीत 17 हजार 34 मतदार आहेत. पैकी 7677 नागरिकांनी मतदान केले होते.

सकाळी 8 वाजता रवींद्र भवन बायणा येथे मिनी सभागृहात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीनंतर मेर्सियाना वास यांनी 1912 मताने आघाडी घेतली. तर काँग्रेसचे उमेदवार व्हॅलेंट बारबोझा यांना 533 मते प्राप्त झाली होती. दुसऱ्या फेरीतही मर्सियाना वास यांनी 1523 मतांची आघाडी घेतली. या फेरीत आरजीचे उमेदवार लेस्ली गामा यांनी 633 मते घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला पाठीमागे टाकले. तर तिसऱ्या फेरीत वास यांनी आघाडी कायम ठेवत आपला विजय पक्का केला. तर आरजीच्या लेस्ली गामा यांनीही आपली आघाडी घेऊन दुसऱ्या स्थान वर कायम राहीले.

पहिल्या फेरीत 299 मतांपैकी 17 मते अवैध ठरविण्यात आली. दुसऱ्या फेरीत 2738 मतांपैकी 29 मते, तर तिसऱ्या फेरीत 1940 मतांपैकी 14 मते अवैध ठरविण्यात आली. एकूण 7677 पैकी 60 मते अवैध ठरली.

मतदारांनी साथ दिल्याने विजय शक्य

मेर्सियाना वास यांनी मतदारांनी मोठी आघाडी दिल्याने विजय प्राप्त झाला असल्याचे सांगून कुठ्ठाळीतील मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले. आमदार वास कुठ्ठाळीत काँग्रेस संपल्यातच जमा असल्याचं म्हटले आहे. तसेच मतदारांनी कुठ्ठाळी मतदारसंघात मला दोन वेळा, तर आता माझ्या पत्नीला निवडत हॅट्रिक साधल्यांचे सांगत मतदारांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com