Cortalim Zuari Bridge: झुआरी पुलाची वाहतूक पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

राष्ट्रीय महामार्ग कुठ्ठाळी ते आगशी येथे बांधण्यात आलेल्या महामार्गाची केली पाहणी
Zuari Bridge
Zuari BridgeDainik gomantak

वास्को: कुठ्ठाळी येथील झुआरी नदीवरील नवीन पुलाच्या रॅम्पची पाहणी दक्षिण गोवा वाहतूक पोलीस अधीक्षक धर्मेश आंगले यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी उपस्थित होते.

(Cortalim Zuari new bridge traffic inspected by Superintendent of Police)

वाहतूक पोलीस अधीक्षक आंगले यांनी पुलावर जाणाऱ्या कुठ्ठाळी येथील रस्त्याची पाहणी करून दिशा फलक कोणत्या ठिकाणी लावावे याचा आढावा घेतला. येत्या नोव्हेंबर 2022 पर्यंत झुआरी नदीवरील नवीन पुलावर वाहतूक सुरू करण्यात येईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूर्वीच जाहीर केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग कुठ्ठाळी ते आगशी येथे बांधण्यात आलेल्या महामार्गाची सोमवार दि.19 दक्षिण वाहतूक पोलीस अधिक्षक यांनी नवीन उड्डाणपूलाची पाहणी दिलीप बिल्डकॉन अधिकाऱ्या समवेत केली. यावेळी त्याने नवीन पुलावर बसवण्यात आलेल्या रॅमची पाहणी केली. तसेच कुठ्ठाळी येथून नवीन पुलावर जाणाऱ्या उड्डान पुलाच्या रस्त्याची पाहणी करून दिशा फलक किती ठिकाणी लावावे याची पाहणी केली. सदर नवीन पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर वाहन चालकाने वेग मर्यादा सांभाळून वाहने चालवावी असे आवाहन आंगले यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com