
मडगावचे गांधी मार्केट हे पूर्वीपासून चर्चेचा विषय ठरले आहे. तेथे दिवसाढवळ्या मारामाऱ्या, भांडणे व अनैतिक कृत्येही होतात. मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन एका आकाश शेख नामक व्यक्तीने मुख्याधिकाऱ्यांकडे अज्ञाताविरोधात केलेल्या तक्रारीवरून मार्केटमधील बेकायदेशीर कामांना वाचा फोडली.
तक्रारदाराने तक्रारीच्या प्रती पालिकेच्या मार्केटिंग समितीच्या अध्यक्ष दीपाली सावळ यांच्यासह इतर सदस्यांनाही पाठविल्या आहेत.
गांधी मार्केटमधील ११७ व ११८ क्रमांकाची दुकाने ही वेगवेगळी आहे. मात्र आता कोणी अज्ञानाने दोन्ही दुकानामधली भिंत मोडून ते एक दुकान केले आहे असे तक्रारीत म्हटले आहे. ११७ हे दुकान शेख आदम तर ११८ हे दुकान सुरेश देसाई यांच्या नावे आहे.
दोन्ही दुकानांमधली भिंत मोडण्याची परवानगी कुणी दिली? हे दुकान नेमके कोणाच्या नावावर आहे? सध्या त्याचा मालक कोण? याची चौकशी करून दोषीविरोधात कारवाई करावी तसेच अशा प्रकारे बेकायदेशीर हडप केलेली दुकाने नगरपालिकेने ताब्यात घ्यावी अशी मागणी आपण नगराध्यक्ष शिरोडकर तसेच मुख्याधिकाऱ्यांकडे केल्याचे महेश आमोणकर यांनी सांगितले. दोघांनीही सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्र्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
"मृताच्या नावे असलेल्या दुकानांवर काहींनी बळजबरीने ताबा मिळविला आहे. वीजबिलावर एकाचे नाव तर दुकान दुसराच चालवितो, असे प्रकारही सुरू आहेत. गांधी मार्केट व न्यू मार्केटमध्ये जे बेकायदेशीर प्रकार सुरू आहेत, त्याबद्दल आपण मार्केटिंग समितीचा सदस्य या नात्याने नगरपालिका कौन्सिलच्या बैठकीत मुद्दा मांडणार आहे."
महेश आमोणकर, नगरसेवक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.