गोवा टॅक्सीचालकांसाठी दाबोळी विमानतळावर दोन काउंटरची सोय
दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांसाठी दोन काउंटरचे उद्घाटन करताना मंत्री माविन गुदिन्हो.सोबत इतर.Dainik Gomanatk

गोवा टॅक्सीचालकांसाठी दाबोळी विमानतळावर दोन काउंटरची सोय

गोवेकरांचा व्यवसाय हा गोवेकरांच्या हाती राहिला पाहिजे, टॅक्सीचालक हे गोवा पर्यटनाचे राजदूत

दाबोळी: 'अतिथी देवो भवः' नुसार पर्यटकांना चांगली सेवा द्या. टॅक्सीचालक हे पर्यटनाचे राजदूत आहेत. त्यामुळे स्वतःची चांगली प्रतिमा तयार करा, असे आवाहन वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो (Transport Minister Movin Gudinho) यांनी केले.

दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांसाठी दोन काउंटरचे उद्घाटन करताना मंत्री माविन गुदिन्हो.सोबत इतर.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

दाबोळी विमानतळावर बुधवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांसाठी दोन काउंटर उघडण्यात आले आहेत. त्या काउंटरांचे उद्घाटन मंत्री गुदिन्हो यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनानंतर पत्रकारांकडे बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, गोवेकरांचा व्यवसाय हा गोवेकरांच्या हाती राहिला पाहिजे. मात्र, गोवा माईल्स गोव्यामध्ये आल्यावर काही समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे टॅक्सीचालकांनी आझाद मैदान व इतर ठिकाणी आंदोलने केली होती.

दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांसाठी दोन काउंटरचे उद्घाटन करताना मंत्री माविन गुदिन्हो.सोबत इतर.
पर्यटकांची चार्टर विमानाने 15 ऑक्टोबर पासून गोव्यात उतरणार

यावेळी मी त्यांना आश्वासन दिले होते की, तुमचा काउंटर तुम्हाला मिळणार. त्या आश्वासनानुसार त्यांना काउंटर देण्यात आले आहेत. दाबोळी विमानतळावर कदंब महामंडळाचाही कदंब जेव्हा काउंटर असेल.इलेक्ट्रॉनिक बसगाड्या आणणार त्यावेळी त्या बसची सेवा निदान व कळंगुट व मडगाव येथे सुरू असली पाहिजे. आणीबाणीप्रसंगी काहीवेळा विमानतळावरील टॅक्सीसेवा ठप्प होते. अशा परिस्थितीत लोकांना कदंबची सेवा मिळेल, असे त्यांनी सांगितले.मॉविन म्हणाले की,

दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांसाठी दोन काउंटरचे उद्घाटन करताना मंत्री माविन गुदिन्हो.सोबत इतर.
Goa Politics: अंमली पदार्थ विकणारे निवडणुकीचे उमेदवार झालेत !

काउंटरचे सोपस्कार अगदी कमी वेळात करण्यात आले. यावरून हे सरकार टॅक्सीवाल्यांसोबत असल्याचे सिद्ध होत आहे. डिजिटल मीटरमुळे पारदर्शीपणा येईल. भाडे समान असेल. त्यामुळे लोकांना किती टॅक्सीभाडे द्यावे लागणार यासंबंधी माहिती मिळण्यास मदत होईल.तसेच टॅक्सीचालक म्हणाले की,दाबोळी विमानतळावर मागील दाराने गोवा माईल्सचा काउंटर आला नाही पाहिजे.येथे त्यांना काउंटर घालता येत नाही. त्यांना फक्त माहिती देता येईल. गेल्या वेळेस येथे गोवा माईल्सचा जो काउंटर होता तो फक्त पर्यटकांना माहिती देण्यासाठी होता. गोवा माईल्स गोव्यात येताना आम्हाला विश्वासात घेतले नव्हते असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.