मोदींच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने विकास करेल: दिव्या राणे

Valpoi: मोर्ले येथे वैद्यकीय शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद..
Dr. Divya Rane
Dr. Divya RaneDainik Gomantak

Medical Camp: गेल्या आठ वर्षांत नरेंद्र मोदी यांनी देशाला चांगल्या प्रकारे दिशा दिलेली आहे .त्यांनी विविध कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने विकास करेल, असे प्रतिपादन पर्ये मतदारसंघाच्या आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. दिव्या राणे यांनी केले आहे.

मोर्ले-सत्तरी येथील कम्युनिटी सभागृहात आयोजित वैद्यकीय शिबिरात राणे बोलत होत्या. या वेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर, मोर्ले पंचायतीचे सरपंच अमित शिरोडकर, केरी जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस उपस्थित होते.

Dr. Divya Rane
Madgaon Mayor Election : दामोदरांच्या वाटेत काटेच; मडगाव नगराध्यक्ष निवडीत ‘ट्विस्ट’

तसेच, भाजपचे प्रभारी विनोद शिंदे, सरपंच उदयसिंग राणे, पर्ये पंचायतीच्या सरपंच रती गावकर, होंडा जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, केरी पंचायतीच्या सरपंच दीक्षा गावस, पर्ये पंचायतीच्या उपसरपंच उर्मिला माईणकर, पंच सभासद मसो तानवडी, भाग्यश्री गावकर, शोभा गावस यांची उपस्थिती होती.

घोडेमळ येथे लवकरच ग्रामीण आरोग्य केंद्र: आरोग्य खाते व महिला व बालकल्याण खात्याच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली जातील. जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी खास प्रयत्न होतील. येणाऱ्या काळात घोडेमळ या ठिकाणी ग्रामीण आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

Dr. Divya Rane
Colvale Jail : रक्षकाला मारहाण; कोलवाळ कारागृह पुन्हा चर्चेत

1292 नागरिकांचा सहभाग : या वैद्यकीय शिबिरात एकूण 1292 जणांनी भाग घेतला. 240 जणांनी डोळ्यांची तपासणी, 254 जणांनी हाडांची तपासणी, 102 जणांना त्वचारोगासंदर्भात उपचार मिळणार आहेत. वैशिष्ट्य म्हणजे एकूण 27 आभा कार्डची नोंदणी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com