न्यायालयाने गोवा सरकारला दिलेले 10 आदेश 

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 मे 2021

कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक सुविधा पुरविण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्न व सद्यस्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देश सुनावणी येत्या मंगळवारी म्हणजेच 11 मे रोजी होणार आहे. असे आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले. 

पणजी: गोव्यात (Goa) कोरोनाचा वाढता कहर बघता(corona) मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ही साखळी तुटण्याचे कुठलेच संकेत गोवा राज्यात दिसत नाही. रुग्ण मृत्यूचे प्रमाण घटण्यास सुरवात होईल, असे वाटत असतानाच काल पुन्हा 58  जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. म्हणूनच आता गोव्यात येत्या 10 मे नंतर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या(Mumbai high court) गोवा खंडपीठाने(Goa Court) तसा आदेश काल गोवा सरकारला दिला आहे.(The court directed the Goa government to provide information on the purchase of 200 ventilators)

गेल्या पाच दिवसात 333 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील(Gomaco) प्राणवायूची समस्या दूर केली गेली असतानाही मृत्यूची संख्या कमी होत नसल्याचे पाहून सरकारी यंत्रणा हादरली आहे. याच पार्श्‍वभूमीवर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेत येत्या सोमवारी म्हणजेच 10 मे पासून गोव्यामध्ये प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्याचा आदेश गोवा सरकारला दिला आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक सुविधा पुरविण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्न व सद्यस्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देश सुनावणी येत्या मंगळवारी म्हणजेच 11 मे रोजी होणार आहे. 

न्यायालयाने सरकारला दिलेले आदेश 

1] कोरोना चाचणी अहवाल लवकर उपलब्ध करा  
2] ‘त्या’ 200 व्हेंटिलेटर्स खरेदीची माहिती द्या
3] सीमेलगतच्या चेकनाक्यांवर करडी नजर ठेवा 
4] टाळेबंदीसंदर्भात भूमिका स्पष्ट करा
5] संकेतस्थळ अपडेट करून माहिती लोकांना द्या 
6] प्राणवायू, खाटा व औषधे साठ्याची माहिती द्या 
7] वॉर्डमधील उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा द्या 
8] 10 मे पासून अंमलबजावणी हवी
9] सेवासुविधांचे अपडेट जारी करा
10सरकारच्या भूमिकेवर गोवा खंडपीठाची 11 मे रोजी सुनावनी

संबंधित बातम्या