COVID19 Goa: रुग्ण जमिनीवर पडून, बेड कधी मिळणार?: न्यायालयाचा सवाल

The court questioned the government about the Corona situation in Goa
The court questioned the government about the Corona situation in Goa

पणजी: गोमेकॉ इस्पितळासाठी (Gomaco Hospital) व सुपर स्पेशालिटी ब्लॉक इस्पितळासाठी वेगवेगळ्या प्राणवायू पुरवठा (Oxygen Supply) करणाऱ्या टाक्या बसविण्यात आल्या असल्याने प्राणवायू तुटवड्याची समस्या सध्या राहिलेली नाही. वेदांतातर्फे प्रतिदिन ३ मे. टन प्राणवायू उपलब्ध केला जात आहे. अशाप्रकारे आणखी काही कंपन्या सामाजिक बांधिलकीच्या योजनेतून मदत करणार आहेत का? सध्या 550 खाटा असलेल्या सुपर स्पेशालिटी इस्पितळात 350 रुग्ण (Patients) स्थलांतर केले आहेत. काही रुग्णांना अद्याप खाटा उपलब्ध होत नाहीत. त्या केव्हापर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहेत? काही रुग्ण अजूनही इस्पितळ वॉर्डात जमिनीवर आहेत असा प्रश्न खंडपीठाने सरकारला केला. (Court questioned the Goa government about the COVID19 situation in Goa)

त्यावर उत्तर देताना ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी येत्या आठवड्यात खाटा उपलब्ध केल्या जातील, असे आज सुनावणीवेळी सांगितले. गोवा खंडपीठाच्या प्रश्‍नांना उत्तर देताना ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले की, चिंताजनक असलेले रुग्ण गोमेकॉ इस्पितळात दाखल केले जातात. राज्याच्या इतर जिल्हा व उपजिल्हा कोविड इस्पितळात चिंताजनक नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच काही रुग्ण शेवटच्या क्षणी इस्पितळात येतात. त्यामुळे गोमेकॉत रुग्णांचे मृत्यू अधिक दिसून येतात. रात्री 2 ते पहाटे 6 पर्यंतचे रुग्णांचे मृत्यू हे प्राणवायू तुटवड्यामुळेच होतात असे नाही, तर उशिरा इस्पितळात आणले जाते. त्यामुळे ही संख्या मोठी वाटते, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. 

COVID-19 Goa: काल पहिल्यांदाच कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ
कोरोना प्रतिबंधक लसींची जादा गरज 
पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक तसेच दोन हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी सरकारने 5 लाखांच्या लसीची मागणी केंद्राकडे केली असता फक्त 32 हजार डोस पुरविले आहेत. गोव्यातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राकडून प्राधान्यक्रमाने हे डोस का मंजूर केले जात नाहीत? असा प्रश्‍न खंडपीठाने केला. 45 व त्यावरील व्यक्तींनी जर डोस घेतले नाहीत व त्यातील काही उरले तर फुकट किंवा परत जाऊ नयेत. ते 18 ते 44 वयोगटासाठी वापरता येतील का पाहावे अशी तोंडी सूचना खंडपीठाने केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com