गोव्यातील ‘त्या’ संशयितांना जामीन मंजूर

प्रत्येकी 20 हजारांची हमी व तितक्याच रक्कमेचा हमीदारानुसार म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाने हा जामीन मंजूर केला.
गोव्यातील ‘त्या’ संशयितांना जामीन मंजूर
CourtDainik Gomantak

म्हापसा : कर्तव्य बजावत असताना कोलवाळ पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या त्या पेडण्यातील दोघा संशयितांना मंगळवारी न्यायालयाने जामिनावर सोडण्यात आले आहे.संशयित शुभम सुभाष केणी (वय 27, रा. कासारवर्णे पेडणे) व हर्ष प्रेमानंद आरोंदेकर (वय 20, रा. वळपे विर्नोडा पेडणे) या दोघांचा प्रत्येकी 20 हजारांची हमी व तितक्याच रक्कमेचा हमीदारानुसार म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाने हा जामीन मंजूर केला.

Court
अगोदर राज्यातील ऐतिहासिक दस्‍तावेज सांभाळा : आप

ही घटना सोमवारी दुपारी 12च्या सुमारास कोलवाळ पुलावर घडली होती. वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणार्‍या वाहनस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी कोलवाळ पुलावर दोन सहाय्यक उपनिरीक्षक व दोन हवालदार असे चार पोलिस कर्मचारी तिथे तैनात होते.

तेव्हा दुचाकीवरून भरधाव वेगाने आलेल्या या वरील संशयितांना पोलिसांनी अडविले होते. त्यामुळे संशयितांनी या पोलिसांशी हुज्जत घालून तसेच शिवीगाीळ करीत पोलिसांवर लोखंडी सळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com