COVID-19 Goa: गोव्यात कोरोना रिकव्हरी रेट 87.88 टक्के; मात्र मृत्यूचा तांडव सुरूच

COVID-19 Goa
COVID-19 Goa

पणजी: गोवा राज्यात कोरोना(Covid-19) हळूहळू नियंत्रणात येत आहे. मात्र, कोरोनाबाधितांचे मृत्यू कमी होताना दिसत नाहीत. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य खात्याने लक्ष केंद्रित केले आहे. काल राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी तब्बल 87.88 टक्के एवढी झाली असून, दिवसभरात 1487 नवे कोरोना बाधित सापडले. तर 1363 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या आठ दिवसांत पहिल्यांदाच बरे होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे.(COVID-19 Corona recovery rate in Goa is 87 88 percent)

काल बुधवारी 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यातील 24 कोरोनाबाधित हे गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार घेत होते, तर 6 जण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये उपचार घेत होते. एक कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेत होता. तर एक केपे आरोग्य केंद्रात दगावला. सात रुग्णांचे दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात उपचार घेताना निधन झाले आहेत. 

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काल 4615 कोरोना स्वॅबची तपासणी करण्यात आली. काल जाहीर झालेल्या अहवालानुसार, 1487 नवे कोरोनाबाधित सापडले. तर 1367  कोरोना रुग्ण  बरे झाले आहेत. आणि 39 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत 2499 कोरोनाबाधित दगावले आहेत. राज्यात आता सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 15791 एवढी आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी1322 जणांनी घरीच अलगीकरणात राहून उपचार घेणे पसंत केले आहे. तर 165 जण इस्पितळात दाखल झालेले आहेत. काल दिवसभरात 134 कोरोनाबाधितांनी डिस्चार्ज  घेतला. 

सासष्टी तालुक्यात 3,555 कोरोनाबाधित
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सासष्टी तालुक्यात सलग चार दिवसांपासून कमी झालेली दिसून येत होती. पण, काल कोरोनाबाधित रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. सासष्टीत परवापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3486 पोहचली होती तर काल आकडा 3555 वर पोहचला आहे. गोवा राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांतील आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, या आकडेवारीनुसार मडगाव नागरी आरोग्य केंद्रात 25 मे रोजी 1480 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. काल आकडा 1502 वर पोहचला आहे. कासावली आरोग्य केंद्रात 624 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती तर काल हा आकडा 649 वर पोहचला आहे. नावेली आरोग्य केंद्रात 233 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती, काल तो आकडा 243 वर पोहचला आहे. चिंचिणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 211 होती काल 235 वर पोहचली आहे. कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 461 रुग्ण आहेत. लोटली प्राथमिक आरोग्य केंद्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 477होती काल469 वर पोहचली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या: गुदिन्हो
राज्यात कोविडमुळे जे नागरिक मृत्यू पावले आहेत, त्यांच्या कुटुंबाना सरकारने आर्थिक मदत द्यावी. आपण या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्याशी बोललो आहे, अशी माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिली. केंद्राकडून गोव्याला जे 300 कोटी मिळणार आहेत, त्यातील 100 कोटी यासाठी वापरता येतील, असेही गुदिन्हो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com