COVID-19 Goa: ऑक्सिजन अभावी 2 दिवसात 41 रूग्णांचा मृत्यू

COVID-19 Goa 41 patients died in 2 days due to lack of oxygen
COVID-19 Goa 41 patients died in 2 days due to lack of oxygen

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात(Goa Medical College and Hospital) कोरोनाग्रस्त रुग्णांचा ऑक्सिजन (Oxygen)अभावी मृत्यू(Deaths) होऊ देऊ नका, अशा सूचना करूनही 40 पैकी 15 जणांचा मृत्यू बुधवारी मध्यरात्री 2 ते पहाटे 6 या दरम्यान झाला. हे मृत्यूसत्र सुरू असच आहे. गोव्यातील(Goa) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात(Gomeco) 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. आणि कालही आणखी 15 रूग्णाचा ऑक्सिजन अभावीच मृत्यू झाला आहे. म्हणजे आता एकूण 15+26= 41 जणाचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला आहे. हे मृत्यू थांबविण्यासाठी ऑक्सिजन सुरळीत ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपयश आल्याने दुःख होत आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने(High Court of Bombay in Goa) भावनाविवश होत खंत व्यक्त केली आहे. त्यामुळेच काल खंडपीठाने आदेश जारी करताना सुविधांच्या कार्यवाहीचा अहवाल आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश आरोग्य सचिव रवी धवन यांना दिले आहेत.(COVID-19 Goa 41 patients died in 2 days due to lack of oxygen)

गोवा राज्यात 1 ते 13 मे या कालावधित तब्बल 39078 एवढे कोरोनाबाधित सापडले. त्यापैकी 769 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत 63 जणांचा बळी गेला आहे. ऑक्सिजन पुरवठ्यातील अनियमितपणामुळे रुग्ण मृत्युमुखी पडतात असा बीजेपी सरकारवर आरोप आहे. काल गुरुवारी पहाटे 2 ते 6 या वेळेतच पुन्हा 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी सरकारतर्फे विविध पावले उचलली जात आहेत. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीही हा मे महिना मृत्यूचे प्रमाण वाढवणारा ठरला आहे. त्याचबरोबर रुग्ण संख्याही चाळीस हजारांकडे पोचली आहे. गेल्या तीन दिवसांत 208 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यावरून राज्यात कोरोनाची स्थिती किती गंभीर झाल्याचे आणि सरकारच्या हाताबाहेरही गेल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल 7084 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2491 जण कोरोनाबाधित सापडले. गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या 63 व्यक्तींचे निधन झाल्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 1937 वर पोचली आहे. या मृत्यूमागील विशेष बाब म्हणजे हे मृत्यू मध्यरात्री 2 ते  पहाटे 6 वेळेच्या दरम्यान होत आहेत.

दरम्यान गोव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. आणि कालही आणखी 15 रूग्णाचा ऑक्सिजन अभावीच मृत्यू झाला आहे. म्हणजे आता एकूण 15+26= 41 जणाचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या (Bombay High Court)गोवा खंडपीठाने गोव्यातील अव्वल रुग्णालय, गोवा मेडिकल कॉलेज येथे ऑक्सिजन उपलब्धतेच्या कथित कमतरतेची चौकशी केली पाहिजे आणि न्यायालयाने आरोग्यासंदर्भात कोविडचे व्यवस्थापन आपल्या हातात घ्यावे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com