COVID-19 Goa: 5 टक्के कोरोना रूग्णांचा पॉझिटिव्हिटी दर 50 टक्कयांपर्यंत कसा गेला?

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 मे 2021

14.57 लाख लोकसंख्येच्या गोव्या राज्यामध्ये दररोज सुमारे 50 ते 75 नवीन कोविड प्रकरणे नोंदली जात होती, ज्याचा कोविड पॉझिट्व्हचा दर 5 टक्के होता. जो आज आचनक 50 टक्के झाला आहे. गोव्याचा रिकवरी दर 97 टक्के होता आणि कोविड रूग्णांची संख्या अंदाजे 700 होती.

मुंबई: दोन महिन्यांपूर्वी, मुंबईतील(Mumbai) लोकसंख्येच्या 12 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 14.57 लाख लोकसंख्येच्या गोव्या(Goa) राज्यामध्ये दररोज सुमारे 50 ते 75 नवीन कोविड प्रकरणे नोंदली जात होती, ज्याचा कोविड पॉझिट्व्हचा(Covid positive) दर 5 टक्के होता. जो आज आचनक 50 टक्के झाला आहे. गोव्याचा रिकव्हरी दर(रिकवरी दर) 97 टक्के होता आणि कोविड रूग्णांची(COVID-19) संख्या अंदाजे 700 होती.(COVID-19 Goa How did the positive rate of 5 percent corona patients go up to 50 percent)

भूतकाळात डोकावून पाहीले तर गोव्यातील पर्यटकांचा गर्दी विस्तीर्ण रस्त्यांवर फिरणारे बाइक्स प्रेमी, समुद्रकिनार्यावरील अनेक शॅक, फ्लोटिंग कॅसिनो आणि ग्लिझी रिसॉर्ट्सवरील, मास्क न घातलेल्या पर्यटकांची गर्दी. सोशल डिस्टंन्स चा उडालेला फज्जा ही सगळी परिस्थिती या साठी कारणीभूत आहे का? कारण देशातील लहान राज्यतून मोठ्या प्रमाणावर कोविड रूग्णसंख्येची नोंद होत आहे. हे चित्र भयंकर असून शासन प्रशासनाबरोबरच नागरीकांनाही  चिंतेत टाकणारी ही आकडेवारी आहे. दररोज 2500 हून अधिक नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नोंदवली गेल्याने आता कोरोना चाचणीचा दर 42 ते 51 टक्के झाला आहे.

विदेशातील गोमंतकीयांना नातेवाईकांचा घोर! 

कोविडने गेल्या 12 दिवसांत 706 जणांचा बळी घेतला आहे. गेल्या वर्षी कोविडने 706 मृत्यू होण्यास 174 दिवस लागले होते. याचा अर्थ या 12 दिवसात कोविडने दररोज सरासरी 59 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच कोविडमुळे 70 जणांनी आपले प्राण गमावले. मंगळवारी राज्यात सर्वाधिक कोविड मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 26 रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला. अशातच एक आश्चर्याची बाब म्हणजे राज्य सरकारच्या गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पहाटे दोन ते सकाळी सातच्या दरम्यान मृत्यू झाले आहे.

काय आहे गोव्याच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यातील वादाचे कारण ?     

मुख्यमंत्री प्रमोद सावंत किंवा राज्य आरोग्य मंत्री विश्वजित राणेनीही कोणत्याही प्रकारचे स्पष्ट विधान केले नाही. अशातच मुख्यमंत्री आणि आरोग्य मत्र्यांच्या वादाची चर्चा मात्र सर्वत्र पसरत आहे. आजच्या दिवशी राज्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 32791 वर पोचली असून कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी  2 टक्के वाढून ती 72.74 वर पोचली आहे. मात्र कोरोना चाचणीचा दर 42 ते 51 टक्के झाला आहे. गोवा भाजप सरकारने कोरोना परिस्थीतीचा अंदाज न घेतल्याने आता सरकारला कठीण परिस्थितीची सामना करावा लागत आहे.

तज्ज्ञ आणि राजकीय प्रतिस्पर्धी यांचे म्हणणे आहे की गोव्यातील पर्यटक आणि स्थानिक लोकांनी मास्क घालणे सामाजिक अंतर ठेवणे सॅनिटायझरचा वापर करणे टाळले अक्षरश: दुर्लक्षच केले. कोरोनाच्या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्यास सरकार अपयशी ठरले त्याचबरोबर कोरोनाच्या दुसर्‍या लाटासाठी पायाभूत वैद्यकीय सुविधा कितपत सक्षम आहे याची पुर्वतयारी करण्यात गोवा सरकार कमी पडले.

सध्या राज्यात कोरोना पेशंटच्या तुलनेत बेड कमी पडत आहे. ऑक्सिजन पुरवठा कमी पडत आहे. तेव्हा सध्या गोव्यात आता राज्य सरकारने नागरिकांना कोविड प्रतिबंधासाठी आयव्हरमेक्टीन (Ivermectin) गोळ्यांचे वितरण करणे सुरू केले आहे. ज्याबाबत 'डब्ल्यूएचओ क्लिनिकल ट्रायल्सशिवाय कोविडमध्ये इव्हर्मेक्टिन वापरण्याची शिफारस करत नाही', असे WHOने म्हटले आहे.

संबंधित बातम्या