COVID 19 GOA: रुग्ण संख्या घटली चाचण्या घटल्या मात्र BLACK FUNGUSचा कहर कायम

COVID 19 GOA: रुग्ण संख्या घटली चाचण्या घटल्या मात्र BLACK FUNGUSचा कहर कायम
Covid-19 Goa 1.jpg

पणजी: काही दिवसांपूर्वी राज्यात दररोज 3 हजारांहून अधिक कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्या आता दिवसेंदिवस कमी होत आहेत. सोमवारी एकूण 1695 चाचण्या झाल्या. त्यात 252नवे रुग्ण आढळले. एकूण 9 जणांचा मृत्यूची नोंद झाली. यातील चौघांचा मृत्यू गोमेकॉ इस्पितळात, दोघांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात तर दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात, उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात आणि उपजिल्हा इस्पितळ, फोंडा येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. (COVID 19 GOA: Number of Kovid 19 patients decreased but the black fungus crisis persisted)

दरम्यान, आता चाचण्यांची टक्केवारी आता 50 पेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येवरही परिणाम झाला आहे. पावसामुळे लोक कोरोना चाचण्या करणे टाळत असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. दोन महिन्यानंतर एका दिवसातील नव्या रुग्णांची संख्या ३०० च्या खाली आली आहे. 12 एप्रिल रोजी 476 रुग्ण तर 7 मे रोजी सर्वाधिक म्हणजे 4195 रुग्ण आढळले होते.  

डीन म्हणतात, दंडाचे कायदेशीर पत्र नाही!
गोमेकॉच्या कर्मचाऱ्यांनी उघड्यावर जैव वैद्यकीय कचरा जाळल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोमेकॉला 25 हजार रुपये दंड केल्याचे माध्यमातून समजले. मात्र, अद्याप त्याबाबत आपल्याकडे कुठलेही पत्र वा नोटीस आलेली नाही, अशी माहिती डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

‘ब्लॅक फंगस’मुळे एकाचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत 25 कोविडबाधितांना ब्लॅक फंगस (काळी बुरशी)चा संसर्ग झाला. यातील एकाचा रविवारी मृत्यू झाला. ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत 11 जणांचे बळी गेले आहेत. काही बाधितांना कोरोनासह इतरही आजार होते. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ब्लॅक फंगस झालेल्या 14 रुग्णांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com