कोविड-१९ गोवा : पणजीत तीन दिवसांत शंभरीपार

प्रतिनिधी
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

राजधानीत मागील चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन दिवसांचा विचार केला तर एकूण १०३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

पणजी: राजधानीत मागील चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन दिवसांचा विचार केला तर एकूण १०३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात आज सर्वाधिक ४२ जण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यात अर्बन हेल्थ सेंटरमध्ये काम करणाराही कर्मचाऱ्याचा समावेश आहे. १ सप्टेंबरला २३ आणि २ सप्टेंबर रोजी ३८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या अर्बन हेल्थ सेंटरमध्ये स्वॅब तपासणीसाठी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शंभरपेक्षा अधिक रुग्ण असलेली आरोग्यकेंद्रे
मडगाव    ...४४६  
फोंडा    ...३५७
वास्को    ...२८६
पर्वरी    ...२५४
साखळी    ...२४९
पणजी    ...२२४
पेडणे    ...२०७
म्हापसा    ...२०७
वाळपई    ...१५९
बेतकी    ..१४७
चिंबल    ...१४३
कोलवाळ    ...१४३
खोर्ली    ...१३७
कुडचडे    ...१३५
शिवोली    ...१२५
केपे    ...१२१
कुठ्ठाळी    ... ११८
काणकोण    ...११७
हळदोणा    ...११७
कासावली    ...११६
नावेली    ...१०४

संबंधित बातम्या