COVID-19 GOA: दिलासा! कोविड रुग्णांचा टक्का घसरतोय

COVID-19 GOA:
COVID-19 GOA:

पणजी: (Goa Corona Update)राज्यात कोरोना नियंत्रणात येत असून सलग दुसऱ्या दिवशी एक हजार पेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. काल एक हजार पेक्षा कमी 993 कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आज 645 नवे कोरोनाबाधित सापडले. तर 1663 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात कोविडमुळे 28 रूग्ण दगावले.(COVID-19 GOA The percentage of covid patients is declining)

राज्यात आतापर्यंत 1लाख 55 हजार 064 लोक कोरोना बाधित झालेत. जे गोव्याचा लोकसंख्येच्या 10.33  टक्के एवढे आहेत.  त्यातील 1 लाख 38 हजार 429 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.  आजच्या दिवशी राज्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 14010 आहे.  गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच 15 हजाराच्या खाली सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आहे. राज्यात कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारीही वाढली असून ती 89.27 टक्के झाली असून कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर बराच खाली आला असून तो 19.99 टक्के एवढा झालेला आहे. आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 3 हजार 242 कोरोना स्वॅबची तपासणी करण्यात आली. आज जाहीर झालेल्या अहवालानुसार 645 नवे कोरोनाबाधित सापडले. तर 1663 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. 

आज सापडलेल्या 645 कोरोना रुग्णांपैकी 546 जणांनी  घरीच अलगीकरणात राहून उपचार घेण्याचे ठरवले आहे. तर फक्त 99 कोरोनाबाधित इस्पितळात दाखल झाले आहेत. आजच्या दिवशी इस्पितळातून  डिस्चार्ज  घेणाऱ्यांची संख्या 124 एवढी आहे. आज 28 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 2625 वर पोचली आहे. आज जे 28 जण मृत्यू पावले. त्यातील 17 जण गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे उपचार घेत होते. तर 9 जण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार घेताना मरण पावले. उत्तर गोव्यातील मणिपाल या खाजगी इस्पितळांमध्ये एक कोरोनाबाधिताचा  मृत्यू झाला तर दक्षिण गोव्यातील व्हिक्टर इस्पितळात एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.

राज्यात पाचशेपेक्षा जास्त 
कोरोनाबाधित असलेली ठिकाणे
मडगाव 1283, फोंडा 855, कांदोळी 699, पणजी 694, 
पर्वरी 584,  कासावली 573, पेडणे 556,  चिंबल 553,  
कुडचडे 528 व कुडतरी 503.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com