राज्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू; ५४७ नवे कोरोनाबाधित

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

राज्यात आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यात आजवर मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७८ झाली आहे. आजच्या दिवशी ५४७ लोक कोरोना पॉझिटिव्ह ठरले असून ४३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पणजी: राज्यात आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यात आजवर मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७८ झाली आहे. आजच्या दिवशी ५४७ लोक कोरोना पॉझिटिव्ह ठरले असून ४३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यात असणाऱ्या सक्रिय रुग्णांचा आकडा ३६४६ इतका असल्याची माहितीही आरोग्य खात्याने दिली.

आज ज्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गोवा वैद्यकीय इस्पितळात डिचोलीतील अनुक्रमे ७०, ३० वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. इएसआय रुग्णालयात फातोर्डा येथील ६८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना पॉझिटिव्ह ट्रेन, विमान आणि रस्तामार्गे आलेले ८ रुग्ण आहेत.  डिचोली ६८ रुग्ण, साखळी १११ रुग्ण, पेडणे ११३ रुग्ण, वाळपई १०७ रुग्ण, म्हापसा १७९ रुग्ण, पणजी १६७ रुग्ण, बेतकी ६८ रुग्ण, कांदोळी ७४ रुग्ण, कोलवाळ ९९ रुग्ण, खोर्ली  १३६ रुग्ण, चिंबल १०६ रुग्ण, पर्वरी १९७ रुग्ण, कुडचडे  ९१ रुग्ण, काणकोण ७६ रुग्ण, मडगाव ४८२ रुग्ण, वास्को  २३९ रुग्ण, लोटली आरोग्य केंद्रात ६५ रुग्ण, मेरशी  ४० रुग्ण, केपे १११ रुग्ण, शिरोडा ७२ रुग्ण, धारबांदोडा  ५२ रुग्ण, फोंडा २६६ रुग्ण आणि नावेली १०८ रुग्ण अशा प्रकारे आरोग्य केंद्रात रूग्णांची संख्या आहे.

एक टक्के लोकांना कोरोना 
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता १६५५३ इतकी झाली असून एकूण लोकसंख्येच्या सरासरी १ टक्के लोकांना गोव्यात कोरोना संसर्ग झाला असल्याची ही आकडेवारी नमूद करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात लहान राज्य आहे. आणि तरीही गोव्यातील कोरोनाच्या रुग्णांचा संसर्ग चिंतेत टाकणारा आहे. आतापर्यंत राज्यात १ लाख ९५ हजारपेक्षा अधिक कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत १२ हजार सातशे २९ लोक कोरोनामुक्तही झाले आहेत.

दरम्यान, थिवीचे माजी आमदार किरोण कांदोळकर, पत्नी कविता कांदोळकर यांच्यासह कन्याही कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे, असे किरण कांदोळकरांनी फेसबुकच्या माध्यमातून कळविले आहे.
 

संबंधित बातम्या