Covid-19 Goa: मृत्युदरात घट; गुरुवारी 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

Covid-19 Goa  राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत आहे.

पणजी: Covid-19 Goa  राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 5,605 वर पोचली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. गुरुवारी एकूण 13 बळींची नोंद झाली. मृत्यू दर कमी होणे ही दिलासादायक बाब आहे. दिवसभरात 3,298 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातून 413 नवे कोरोनाबाधित आढळून आले. 585 कोरोना रुग्ण हे बरे झाले.(Covid-19 Goa Reduction in mortality Thursday 13 corona patients died)

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 2,899 वर पोचली आहे. सर्वाधिक म्हणजे 535 कोरोना रुग्ण हे फोंडा परिसरात आहेत. मडगावात 385 कोरोना रुग्ण आहेत. पणजी, साखळी, पेडणे, चिंबल, पर्वरी, कुडतरी येथे 200 पेक्षा जास्त व 300 हून कमी रुग्ण आहेत. दरम्यान,  राज्यात सर्वाधिक रुग्ण हे 13 मे रोजी आढळले होते. ही संख्या 32,958 इतकी होती. ती कमी कमी होत पाच हजाराच्या आसपास पोचली आहे.

गोव्यात येत्या तीन दिवसांत ऊन-पाऊस आणि पाणीच पाणी 

 

6लाख लसीकरण
काल गुरुवारी दिवसभरात 8435 जणांना लस देण्यात आली. आत्तापर्यंत 5 लाख 96 हजार 792 इतके लसीकरण झाले. गेल्या आठ दिवसांत सरासरी 8 ते 9 हजार जणांना लस देण्यात येत आहेत.आज  शुक्रवारपर्यंत सहा लाखांचा टप्पा पूर्ण होणार आहे.

संबंधित बातम्या