कोविड-१९ गोवा: राज्यात ६८८ रुग्ण कोरोनामुक्त

State recoveries 688 patients in a day
State recoveries 688 patients in a day

पणजी: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आज आणखी ५ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजवर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३९१ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात ५०३ कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत तर ६८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५४२५ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, आज ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये बार्देश येथील ७५ वर्षीय महिला, मोरजी येथील ७० वर्षीय पुरुष, मडगाव येथील ६४ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय पुरुष आणि कुडतरी येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश  आहे.

गेल्या चोवीस तासात १९८३ जणांच्या कोविड पडताळणी चाचण्या करण्यात आल्या. राज्याचा कोविड रुग्ण बरे होण्यामागची टक्केवारी ८१.५८टक्के इतकी आहे. तर १९५७ जणांचे अहवाल हाती आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डिचोली आरोग्य केंद्रात २०३ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ४२५ रुग्ण, पेडणे आरोग्य केंद्रात २२५ रुग्ण, वाळपई आरोग्य केंद्रात २२९ रुग्ण, म्हापसा आरोग्य केंद्रात २७४ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ३३० रुग्ण, बेतकी आरोग्य केंद्रात १२० रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात १५१ रुग्ण, कोलवाळ आरोग्य केंद्रात २४ रुग्ण, खोर्ली आरोग्य केंद्रात २२२ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात २१९ रुग्ण.

पर्वरी आरोग्य केंद्रात ३९२ रुग्ण, कुडचडे आरोग्य केंद्रात ९२ रुग्ण, काणकोण आरोग्य केंद्रात १३२ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात ४०९ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ३१८ रुग्ण, लोटली आरोग्य केंद्रात ९१ रुग्ण, मेरशी आरोग्य केंद्रात ८९ रुग्ण, केपे आरोग्य केंद्रात ७२ रुग्ण, सांगे आरोग्य केंद्रात ९० रुग्ण, शिरोडा आरोग्य केंद्रात १८ रुग्ण, धारबांदोडा आरोग्य केंद्रात ११८ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १२८ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ५६ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

दरम्यान, उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील खाटांची क्षमता ५४५ इतकी असून २१७ सध्या वापरले जात आहेत आणि दक्षिण गोव्यातील खाटांची क्षमता १००६ असून ५३४ सध्या वापरात असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com