COVID-19 GOA: पहाटेच्या वेळी रुग्ण मृत्यूचे प्रमाण जास्त असण्याचे कारण काय?

COVID-19 GOA What is the reason death of patients between 2 and 6 in the morning
COVID-19 GOA What is the reason death of patients between 2 and 6 in the morning

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय(Goa Medical College)इस्पितळातील काही कोरोनाग्रस्त रुग्णांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याने त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने(Goa Bench Bombay High Court) आज गोवा सरकारला(goa government) जनहित याचिकांवरील सुनावणीवेळी चांगलेच धारेवर धरले. घटनेतील कलम 21 नुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.(COVID-19 GOA What is the reason death of patients between 2 and 6 in the morning)

त्यांना वाचविण्याची सरकारची जबाबदारी आहे, याकडे लक्ष वेधून सरकारला सुनावले. त्यामुळे प्रशासनाने येत्या मध्यरात्रीनंतर एकाही कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू(Death) होणार नाही, यासाठी आवश्‍यक प्रमाणात ऑक्सिजनचा(oxygen) पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देऊन ही सुनावणी पुन्हा उद्या 13 मे रोजी ठेवली आहे. गोमेकॉ(Gomekca) इस्पितळात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असल्याची कबुलीही गोमेकॉ इस्पितळ डीन डॉ. शिवानंद बांदेकर(Dr. Shivanand Bandekar) तसेच कोविड प्रमुख डॉ. विराज खांडेपारकर यांनी खंडपीठासमोर सुनावणीवेळी माहिती दिली. 

कोरोना संसर्ग व कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूमध्ये होणारी वाढ तसेच ऑक्सिजनअभावी रुग्णांचा होणारा मृत्यू याची गंभीर दखल घेताना पहाटे 2 ते 6 या काळात रुग्णांच्या मृत्यूचे कारण काय? इस्पितळात रुग्ण ऑक्सिजनअभावी तडफडत आहे, की नाही? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. ऑक्सिजनमुळे रुग्णांचा मृत्यू झाला असल्यास घटनेचे उल्लंघन झाले आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव गमावण्याची पाळी येत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे व कसा काढण्यात येईल, असा प्रश्‍न खंडपीठाने केला. कोरोना रुग्णांची तसेच ऑक्सिजन पुरवठासंदर्भात जी माहिती सादर केली आहे, ती भयावह आहे. त्यामुळे इतर सर्व विषय बाजूला ठेवून या विषयाला प्राधान्य देण्याची गरज आहे. सुनावणीवेळी ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम, महसूल सचिव पुनित कुमार गोएल, आरोग्य सचिव रवी धवन, नगर विकास सचिव थॉमस तारिक, गोमेकॉ डीन शिवानंद बांदेकर तसेच कोविड नोडल अधिकारी डॉ. विराज खांडेपारकर यांनी गोमेकॉ इस्पितळात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तसेच खाटांचा तुटवडा आहे, हे मान्य केले.

इस्पितळात कोरोनाग्रस्त सुमारे 950 रुग्ण दाखल असून खाटा मात्र ७०० आहेत. इस्पितळात ज्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू त्यांनी सत्यपरिस्थिती जनहित याचिकेसोबत सादर केलेल्या माहितीनुसार उघड होत आहे, हे उघड झाले आहे. गोमेकॉ इस्पितळातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दुपारी 2 वा. किमान 500 जंबो ऑक्सिजन सिलिंडर्स त्यानंतर प्रत्येक आठ तासानंतर म्हणजे रात्री 10 वा. 250 जंबो सिलिंडर्स व पहाटे 6 वा. 250 जंबो सिलिंडर्सची आवश्‍यकता आहे, अशी माहिती डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी खंडपीठाला दिली. त्यामुळे ‘स्कूप’ इंडस्ट्रिजला आज खंडपीठाने 55 ट्रॉली व 600 जंबो सिलिंडर्स दुपारी वाजेपर्यंत  गोमेकॉ इस्पितळात उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. गोवा खंडपीठ जी सांख्यिकी माहिती दिली आहे. त्या खोलवर जात नाही, मात्र मध्यरात्रीच्यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होणार नाही हे अधिक महत्त्वाचे आहे. सचिव गोएल व सचिव तारीक हे डॉक्टर्स असल्याने त्यांनी डीन डॉ. शिवानंद बांदेकर व डॉ. विराज खांडेपारकर यांच्याशी समन्वय साधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत कसा होईल, यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत. गोमेकॉत इस्पितळात ‘एचएफएनओ’चा वापर अधिक ऑक्सिजन लागत असल्याने केला जात नाही, अशी माहिती डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली असता खंडपीठाने या पद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com