COVID-19: राज्यात कलम 144 नव्हे तर विशेष ‘एसओपी’, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

गेल्या 18 सप्टेंबरपासून राज्यात आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कोविडसाठी (COVID-19) विशेष ‘एसओपी’ (SOP)च लागू करण्यात आली आहे.
COVID-19: राज्यात कलम 144 नव्हे तर  विशेष ‘एसओपी’, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
COVID-19 government declare new SOP's in Goa says Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak

पणजी : राज्यात कलम 144 मागे घेण्यात आले असून, गेल्या 18 सप्टेंबरपासून राज्यात आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कोविडसाठी (COVID-19) विशेष ‘एसओपी’ (SOP)च लागू करण्यात आली आहे. असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी केला आहे. (COVID-19 government declare new SOP's in Goa says Chief Minister Dr. Pramod Sawant)

COVID-19 government declare new SOP's in Goa says Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa: राज्यात NCBच्या कारवाया,24जणांना अटक मोठ्या प्रमाणात आम्ली पदार्थ जप्त

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या आठवड्यात जारी केलेली ‘एसओपी’ कदाचित लोकांना समजली नसेल. कोविड नियमांचे पालन करून धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी आधीच दिलेली आहे. गेल्या शनिवारी जारी केलेल्या आदेशाद्वारे, गोवा सरकारने कोविडसंबंधी कर्फ्यूमध्ये आणखी शिथिलता आणली होती. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत किंवा ज्यांच्याकडे निगेटिव्ह अहवाल आहे, अशांना 20 सप्टेंबरपासून कॅसिनो, स्पा, नाईट क्लब किंवा इतर पर्यटन स्थळात प्रवेश करण्याची परवानगी आहे. 9 मेपासून राज्यात कोविड उद्रेकामुळे संचारबंदी लागू होती.

दरम्यान, राज्यात पर्यटन आता सुरू झाले आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक ठिकाणी शारिरीक अंतराच्या नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com