GOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय

GOA:  कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय
covid-19 goa

पणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती पाच हजारांच्या (4882) खाली आली. राज्यात आतापर्यंत 1 लाख 62 हजार 468 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 1 लाख 54 हजार 658 बाधित बरे झाले. आतापर्यंत 2,928 बळींची नोंद झाली आहे. 13 मे रोजी सर्वाधिक म्हणजे 32,953 ही बाधितांची संख्या होती. त्यानंतर ती कमी कमी होत गेली. आरोग्य खात्याने जारी केलेल्या पत्रकानुसार, रविवारी 2002 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून 420 नवे बाधित आढळून आले. तर 581 बाधित बरे झाले. 14 जणांचा मृत्यू झाला.(COVID 19 The number of active corona patients in Goa is declining)

ब्लॅक फंगसचे आतापर्यंत 24 रुग्ण 
राज्यात ब्लॅक फंगसचे आतापर्यंत 24 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 10 जणांचा मृत्यू झाला. 11 रुग्णावर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात व 3 रुग्णांवर खासगी इस्पितळात उपचार सुरु आहेत. देशातील इतर राज्यांसह गोव्यातही काही कोरोना रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण होत आहे. आतापर्यंत जे 10 रुग्ण दगावले त्यातील 4 मृत्यू हे कोरोनानंतर झालेल्या ब्लॅक फंगसमुळे झाले आहेत तर 6 मृत्यूंना ब्लॅंक फंगस हे मुख्य कारण नसून कोरोनासह इतर आजार कारणीभूत आहेत, असे गोमेकॉचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले.

गोमेकॉत खास वाॅर्ड
पहिल्या लाटेवेळी ब्लॅक फंगसची लागण एकाही कोरोना रुग्णाला झाली नव्हती, मात्र दुसऱ्या लाटेवेळी जगातील काही देशातील रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाल्यानंतर हा आजार भारतात आला. गोवा सरकारने ब्लॅक फंगस रोगाची गंभिरपणे दखल घेऊन गोमेकॉमध्ये एक खास वार्ड स्थापन केला असून ब्लॅंक फंगसवरील पुरेसी इंजेक्शने तथा औषधे गोवा सरकारकडे असल्याचे डॉ. बेतोडकर यांनी सांगितले. गोमेकॉच्या इएनटी विभागाच्या सर्जन डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक ब्लॅक फंगस रुग्णावर योग्य ते उपचार करीत आहेत.

थोडक्यात आकडेवारी

  • एकूण बाधित..................................1,62,468
  • एकूण बरे झालेले.............................1,54,658
  • एकूण मृत्यू ......................................2, 928
  • एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू ...........(May 11) ..... 75
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com