व्ही फॉर फातोर्डातर्फे कोविड मदत केंद्र

प्रतिनिधी
रविवार, 16 ऑगस्ट 2020

फातोर्डातील कोविड रुग्णांच्या सोयीसाठी व्ही फॉर फातोर्डोतर्फे डॉ. मिलींद देसाई यांच्या वैद्यकीय संशोधन केंद्राच्या सहकार्याने कोविड मदत केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

मडगाव: फातोर्डातील कोविड रुग्णांच्या सोयीसाठी व्ही फॉर फातोर्डोतर्फे डॉ. मिलींद देसाई यांच्या वैद्यकीय संशोधन केंद्राच्या सहकार्याने कोविड मदत केंद्र सुरु करण्यात येणार आहे. कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा व पारिचारिकायुक्त रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार असून या दोन्ही उपक्रमाचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन करण्यात येणार आहे. 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या वर  गेली आहे  मृत्यूंची संख्याही वाढत असून   राज्यातील स्थिती चितांजनक आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.  
सरकारच्या फातोर्डातील कोविड निगा केंद्राची क्षमता भरल्याने येथील लोकांना उपचारासाठी दूर दूर जावे लागते. अशा परिस्थितीत घरी राहून स्वतःवर उपचार करणाऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळावे, यासाठी फातोर्डाचेच सुपुत्र असलेले डॉ. मिलिंद देसाई व त्यांच्या देसाई वैद्यकीय संशोधन केंद्राच्या सहकार्याने फातोर्डात कोविड मार्गदर्शन आणि मदत केंद्र सुरू करत असून उद्यापासून हे केंद्र सुरू होणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. या केंद्रात  8888411111 या क्रमांकावर मदतवाहिनी सुरू केली असून त्यावर डॉ. देसाई व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित बातम्या