कोरोनाचे उपचार आता 'डीडीएसएसवाय'च्या अंतर्गत; गोवा सरकारचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

गंभीर रूग्णांसाठी खाट भाडे बाराशे रूपये, सीबीसी, एबीजीसाठी ८०० रूपये, व्हेंटिलेटरसाठी २ हजार रूपये,  डॉक्टर व सल्लागार शुल्कापोटी  ६०० रूपये, असे दिवसा ६६०० रूपये या योजनेतून इस्पितळाला देण्यात येणार आहेत.

पणजी- राज्य सरकारने कोरोनाला आरोग्य विम्याच्या कक्षेत आणले आहे. दीनदयाळ स्वास्थ सेवा योजनेंतर्गत (DDSSY) आता कोविड उपचारही आणण्यात आले आहेत. या योजनेतून सरकारमान्य खासगी इस्पितळात विनाशुल्क उपचार घेण्याची सोय आहे. आता कोविडवरील उपचारही या कार्डाच्या मदतीने करता येणार आहेत.

किरकोळ लक्षणे असलेल्या रूग्णासाठी दिवसा रूपये 4600 तर गंभीर रूग्णासाठी दिवसा रूपये ६६०० खर्च या योजनेतून केला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. 

गंभीर रूग्णांसाठी खाट भाडे बाराशे रूपये, सीबीसी, एबीजीसाठी ८०० रूपये, व्हेंटिलेटरसाठी २ हजार रूपये,  डॉक्टर व सल्लागार शुल्कापोटी  ६०० रूपये, असे दिवसा ६६०० रूपये या योजनेतून इस्पितळाला देण्यात येणार आहेत. खासगी इस्पितळात या योजनेतून रूग्ण दाखल करण्याच्या वेळेला इस्पितळाचे पत्र आणि कोविडची लागण झाल्याचा अहवाल आवश्यक आहे.   

संबंधित बातम्या