Covid-19: राज्यात आज दोघांचा मृत्यू , 747 सक्रिय रुग्ण

कोरोनातून बरे होण्याची टक्केवारी 97.70 टक्के आहे आतापर्यंत 3,322 दगावले
Covid-19: राज्यात आज दोघांचा मृत्यू , 747 सक्रिय रुग्ण
Covid-19: Corona Virus दैनिक गोमन्तक

Covid-19: राज्यात आज कोरोनामुळे (Covid-19) दोन कोरोना बाधितांचे निधन (Corona death) झाले. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 4,256 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार आज 86 नवे कोरोना बाधित सापडले तर 66 कोरोना बाधित बरे झाले. आज झालेल्या दोन कोरोना मृत्यूमुळे आत्तापर्यंत एकूण कोरोनामुळे निधन झालेल्यांची संख्या 3,322 झाली आहे. राज्यात 747 सक्रिय कोरोना रुग्ण असून कोरोना बरे होण्याची टक्केवारी 97.70 टक्के आहे. गेल्या पाच दिवसात कोरोनामुळे 8 व्यक्ती दगावल्या तर 336 नवे कोरोना बाधित सापडले तर 337 कोरोना बाधीत बरे झाले आहेत.या पाच दिवसात 20,138 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

Covid-19: Corona Virus
फोंडा परिसरात डेंग्यूने घेतला युवतीचा बळी

5 दिवसात 54 हजार लसिकरण

राज्यात गेल्या पाच दिवसात 54,846 इतके लसीकरण झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत 19,55,673 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून त्यात 12,12,845 लोकंनी पहिला डोस तर 7,42,818 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आज ता. 5 ऑक्टोबर रोजी 10,566 येवढे लसीकरण झाले.

Related Stories

No stories found.