Goa Covid-19: पाच दिवसांत 9 कोरोना बळी

गोव्यात कोरोना स्थितीचा नेमका अंदाज घेणे आव्हानात्मक
Goa Covid-19: पाच दिवसांत 9 कोरोना बळी
Goa Covid-19 Dainik Gomantak

पणजी: गोवा राज्यात (Goa) कधी एकही बळी नसतो, तर कधी एकदम चार बळींची नोंद होत आहे. त्यामुळे स्थितीचा नेमका अंदाज घेणे आव्हानात्मक ठरत आहे. गेल्या पाच दिवसांत राज्यात 9 कोरोनाबळी (Corona Death) नोंदवले गेले. मंगळवारी दोन बळींची नोंद झाली. 86 नवे रुग्ण आढळून आले. बळींची एकूण संख्या 3,322 एवढी झाली आहे.

पाच दिवसात 20,138 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मंगळवारी 4,256 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. 66 जण हे बरे झाले. राज्यात 747 सक्रिय कोरोना रुग्ण असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ही 98.70 इतकी आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी 10,566 जणांनी लसीकरणात भाग घेतला. दिवसेंदिवस लसीकरणाचा आकडा वाढत आहे.

Goa Covid-19
दंड न भरल्याने गोव्यातील 5 हॉटेल्सना ठोकले सील

54 हजार लसीकरण

राज्यात गेल्या पाच दिवसांत 54,846 इतके लसीकरण झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत 19,55,673 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून त्यात 12,12,845 लोकांनी पहिला, तर 7,42,818 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Related Stories

No stories found.