कोविड इस्पितळातील बालविभागाची स्थिती दयनीय

Tejshri Kumbhar
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

लहान मुलांना आणि ज्येष्ठांना कोविडपासून अधिक धोका असल्याने त्यांची अधिक काळजी घ्‍या, अशा सूचना केंद्र सरकार वारंवार करीत आहे. मात्र, त्‍याकडे दुर्लक्ष झाल्‍याचे सोमवारी उघड झाले. मडगाव येथील कोविड रुग्णालयातील बालउपचार विभागाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. या विभागात मोठ्या माणसांनाही कोविड उपचारासाठी ठेवले जाते. येथील प्रसाधनगृह स्वच्छ केले जात नाही. तसेच येथे महिला आणि पुरुषांना एकत्र ठेवले जात असल्याने महिलांना अवघडल्‍यासारखे होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

तेजश्री कुंभार

पणजी :

या बालविभागात एका लहान बाळासह आईलाही उपचारासाठी ठेवले आहे. त्या आईला व्यवस्थतिरीत्या आपल्या मुलाला स्तनपानही करता येत नाही. लहान मुलांच्या विभागात लहान मुले कमी आणि मोठ्या रुग्‍णांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळाली.

‘त्या’ बाळाला राहावे
लागले उपाशी
कोविड इस्‍पितळातील बाल विभागात काही दिवसांपूर्वी एक दोन वर्षाचे बाळ आणि त्याची आई दाखल झाले होते. त्यांचे घर मडगाव येथे असल्याने त्यांना दररोज घराकडून जेवणाचा डबा येत होता. मात्र, सोमवारी या दोघांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, बाहेरील जेवण आत आणण्यास परवानगी दिली नाही आणि कोविड इस्पितळातील जेवणही संपल्याचे सांगत मुलाला जेवण देण्यास नकार दिला. त्यामुळे हे बाळ दुपारपर्यंत उपाशीच असल्याची माहिती मिळाली. त्‍याबद्दल सहकारी रुग्‍णांकडूनही नाराजी व्‍यक्त करण्‍यात आली.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या