राज्यातील कोविड रुग्णालयांना आधीच बॅकअप जनरेटर दिलेत : प्रमोद सावंत 

pramod sawant.jpg
pramod sawant.jpg

पणजी : कोविड 19 विषाणू संक्रमणानंतर राज्यात  तौकाते चक्रीवादळामुळे परिस्थिती  अधिकच बिकट झाली आहे. छोट्या राज्यांच्या इतिहासात अशी घटना फारच क्वचित पाहायला मिळाली आहे. अशातच तौकाते वादळामुळे राज्यात गेल्या 15 तांसापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. आधीच ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णानी  जीव गमावले आहेत. अशातच वादळामुळे राज्यभरातील विजेचे अनेक खांब आणि झाडे उन्मळून पडले आहेत. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.  अशातच सततच्या चक्रीवादळामुळे, जोरदार वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या खांबांच्या दुरुस्तीच्या  कामतही अडथळा येत आहे.  (Covid hospitals have already provided backup generators) 

राज्यभर वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागतील. उत्तर गोव्यातील बार्देश आणि दक्षिण गोव्यातील मुरगांव मध्ये या वादळचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहेत.  गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) मध्येही 15 मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता.  मात्र वादळाची तीव्रता पाहता राज्यातील सर्व कोविड रुग्णालयांना बॅकअप जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. राज्यात चक्रीवादळाची परिस्थिती ओळखून यापूर्वीच वीज विभागाने गोव्यातील सर्व उपलब्ध कंत्राटदारांमार्फत 250 कामगारांद्वारे  हे काम पूर्ण करून घेतल्याची माहिती उत्तर गोव्याचे अधीक्षक अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी दिली आहे. 

राज्यभरात बर्‍याच मोठ्या समस्या उद्भवल्या आहेत. आम्ही या सर्वांना सोडवत आहोत, पण जोरदार वारे आणि पावसामुळे आम्हाला कामात अडथळे येत आहेत. मात्र आम्ही  गोव्यातील सर्व कंत्राटदारांमार्फत  250 लोकांना आधीपासून सर्व वीज उपकेंद्रांवर उभे केले होते. आम्ही आता बेळगाव व कोल्हापूर येथून आणखी 150 कामगारांना बोलावले आहे. या कामगारांमार्फत राज्यातील वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्याचबरोबर  वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमच्याकडे आसलेल्या सर्व संसाधनांचाही  वापर केला जात आहे.  गोव्यामध्ये कोविड -19 विषाणूचे संक्रमण वेगाने वाढत असल्याने विभागाला कर्मचाऱ्यांशिवाय काम करावे लागत असल्याचे स्टीफन फर्नांडिस यांनी म्हटले आहे.  यातील काही कर्मचारी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ति कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याने आम्हाला कर्मचाऱ्यांशिवाय काम करत आहे.  त्यामुळे आमच्याकडे  वीजपुरवठा सुरळीत करण्याऱ्या लाइन हेल्पर्स व तंत्रज्ञांची कमतरता आहे.  अशावेळी आम्ही जर अतिरिक्त कामगार आणले तरी त्यांनी कर्मचार्‍यांकडून योग्य रित्या योग्य मार्गदर्शन घेणेही गरजेचे आहे, असे  स्टीफन फर्नांडिस यांनी यावेळी स्पष्ट केले. 

दरम्यान, रविवारी पहाटेपासून 20 तास  आणि जुन्या गोव्यात 24 तास वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती म्हापुसा, शिवोलीं  याठिकाणी राहणाऱ्या राहिवाश्यांनी दिली आहे. तर लॉकडाऊन दरम्यान यांच्यातील अनेक जणांनी मासे आणि मांस वाळवून साठा करून ठेवले आहेत. मात्र आता या पावसामुळे ते राब होण्याची भीती आम्हाला भेडसावत असल्याचे शिवोलीच्या राहिवाश्यांनी म्हटले आहे.  त्याचबरोबर फोंडा आणि वळपई भागातील विजेचे जवळपास 50 पोल्स खराब झाले आहेत.  तर डीचोलीमध्येही असेच चित्र जागोजागी आढळून आहे. यातील बरेच पोल तुटलेले नसून केवळ जमिनीतून उन्ममळून पडलेले आहेत. याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आता नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्याही भेदवी लागल्याचे काही नागरिकांनी म्हटले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com