येत्या 10 मे पासून गोव्यात येणाऱ्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे: गोवा खंडपीठाचा आदेश

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 मे 2021

गोव्यात येत्या 10 मे नंतर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तसा आदेश आज गोवा सरकारला दिला आहे.

पणजी: गोव्यात (Goa) कोरोनाचा वाढता प्रसार बघता(corona) मृत्यू पावणाऱ्यांची साखळी थांबवण्याचे नाव घेत नाही. आज रुग्ण मृत्यूचे प्रमाण घटण्यास सुरवात होईल, असे वाटत असतानाच काल 71 जणांचा कोविडमुळे सृत्यू झाला. गोव्यात येत्या 10 मे नंतर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या(Mumbai high court) गोवा खंडपीठाने(Goa Court) तसा आदेश आज गोवा सरकारला दिला आहे. गेल्या पाच दिवसात 275 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील(Gomaco) प्राणवायूची समस्या दूर केली गेली असतानाही मृत्यूची संख्या कमी होत नसल्याचे पाहून सरकारी यंत्रणा हादरली आहे. येत्या काही दिवसांत रुग्णांना खाटा कामी पडू शकतील अशा भयावह वेगाने गोव्यात रुग्णसंख्या वाढत आहे.(Covid negative certificate is mandatory for those coming to Goa after May 10)

गोव्यातील वकीलांची उच्च न्यायालयात धाव; 15 दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी 

गोव्यात येत्या 10 मे नंतर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तसा आदेश आज गोवा सरकारला दिला आहे. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला. न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की राज्यभरात कोविड उपचारासाठी उपलब्ध असलेल्या खाटा, प्राणवायू आदीं बाबतची माहिती नियमितपणे संकेतस्थळाद्वारे सर्वांना उपलब्ध केली जावी.

मुरगावचे माजी आमदार शेख हसन हरूण यांचे दुखःद निधन 

दरम्यान 23 एप्रिलपासून गोव्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध राज्य आहे. गोव्यात फिरायला जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर गोव्यात झपाट्याने कोरोनाचा वाढत आहे. शेवटी गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला आहे. कर्नाटकनंतर गोवा हे दुसरं भाजपशासित राज्य आहे जिथे लॉकाडाऊन जाहीर करण्यात आले आहे. गोव्यात लॉकडाऊन करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मध्यंतरी मुख्मंत्र्यांकडे केली होती. मात्र गोवा राज्याचा आर्थिक विकास पर्यटनावर अवलंबून असल्याने मुख्यमंत्र्यानी लॉकडाउनचा प्रस्ताव फेटाळला होता. वाचा एका आठवड्यात कसा वाढला गोव्यात कोरोना.

Third Wave of Corona: गोवा सरकारने GAD कर्मचार्‍यांना सद्गुरुंच्या योग क्रियांचा सराव करण्याचे आदेश दिले 

 

संबंधित बातम्या