सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ

कोविड रिलीफ योजनेंतर्गत पारंपरिक व्यावसायिकांना 5 हजार रुपये अर्थसहाय्य मिळत आहे
Covid Relief Scheme: डीचोली मामलेदार कार्यालयात प्रचंड गर्दी
Covid Relief Scheme: डीचोली मामलेदार कार्यालयात प्रचंड गर्दी दैनिक गोमन्तक

डिचोली: कोविड रिलीफ योजने (Covid Relief Scheme) अंतर्गत सरकारी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी डिचोलीतील पारंपरिक व्यावसायिकांची सध्या धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. आवश्यक प्रमाणित प्रतिज्ञापत्र मिळवण्यासाठी तर डिचोली मामलेदार कार्यालयात रोज पारंपरिक व्यावसायिकांची गर्दी उडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पारंपरिक व्यावसायिकांची तर आज मामलेदार कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती.

Covid Relief Scheme: डीचोली मामलेदार कार्यालयात प्रचंड गर्दी
Covid-19: राज्यात आज दोघांचा मृत्यू , 747 सक्रिय रुग्ण

'कोविड' काळात अनेक पारंपरिक व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. या व्यावसायिकांना कोविड रिलीफ योजनेंतर्गत सरकारच्या समाज कल्याण खात्यातर्फे अर्थसाहाय्य देण्याची योजना सरकारने अंमलात आणली आहे. या कोविड रिलीफ योजनेंतर्गत पारंपरिक व्यावसायिकांना 5 हजार रुपये अर्थसहाय्य मिळत आहे. तर या योजनेंतर्गत 'कोविड' महामारीमुळे बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे. कोविड रिलीफ योजनेंतर्गत डिचोलीत अनेक पारंपरिक व्यावसायिकांनी अर्ज भरले आहेत.

Covid Relief Scheme: डीचोली मामलेदार कार्यालयात प्रचंड गर्दी
अरविंद केजरीवाल गुरुवारी गोवा दौऱ्यावर, राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता

व्यवसायिकांना दिलासा

कोविड रिलीफ योजनेंतर्गत अर्ज सादर करताना आता पारंपरिक व्यावसायिकांचे 300 ते 400 रुपये वाचणार आहेत. आतापर्यंत हा अर्ज शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवर (स्टॅम्प पेपर) प्रमाणित डिक्लेरेशन देणे बंधनकारक होते. शंभर रुपयांचा मुद्रांक पेपर आणि त्यावर डिक्लेरेशनसंबंधीचा मजकूर टाईप करण्यासाठी 200 ते 300 रुपये खर्च येत होता. मात्र आता त्यात सूट देताना अर्जावरच डिक्लेरेशन द्यावे लागणार आहे. तसे सरकारने जाहिर केले आहे. त्यामुळे अर्जदारांचे पैसे वाचणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com