कोविड संशयित रुग्णांचे मृत्यू संशयास्पद

girish
girish

पणजी,

पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचा गोमेकॉ इस्पितळात मृत्यू झाल्यानंतर आणखी एकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात टाळेबंदीच्या काळात कोविड - १९ च्या विलगीकरण कक्षात श्‍वसनामुळे मृत्यू झालेल्यांचे शवचिकित्सा अहवाल व या मृत रुग्णांच्या घशातील लाळेचे जे नमुने घेऊन चाचणी केली होती त्याचे अहवाल सरकारने जाहीर करावे अशी मागणी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या मृत्यूबाबत राज्यात चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी त्रिसदस्यीय समितीद्वारे चौकशी सुरू झाली असली तरी त्यातून तथ्य बाहेर येणार नाही. आणखी एका कोरोना संशयितेचा मृत्यू झाल्याने ही चौकशी निःपक्षपातीपणे व्हायला हवी. ही चौकशी स्वतंत्रपणे होण्यासाठी ती निवृत्त न्यायाधीशांमार्फतच व्हायला हवी या मागणीचा पुनरुच्चार अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
राज्यात आतापर्यंत टाळेबंदीच्या काळात कोविड विलगीकरण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आलेल्या काही रग्णांचा मृत्यू झाला होता मात्र हे सर्वजण कोरोना चाचणी नेगेटीव्ह असलेले होते असा दावा मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी वेळोवेळी केला आहे. देशप्रभू यांच्या मृत्यूनंतर आणखी एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने हे गूढ वाढले आहे. गोमेकॉ इस्पितळ व्यवस्थापनाने या संशयास्पद मृत्यूची चौकशी केल्यास काहीही साध्य होणार नाही. ही चौकशीची जबाबदारी निवृत्त न्यायाधीशांकडे देण्यात यावी. याप्रकरणी एका भाजप नेत्याच्या कुटुंबियांची संबंधित असलेल्या डॉक्टराला अभय देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये असे चोडणकर यांनी केलेल्या मागणीत केली आहे.
गोमेकॉत जितेंद्र देशप्रभू यांच्यासह जे दोन रुग्णांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत त्या प्रकरणाची निःपक्षपणे चौकशी झाल्यास मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळू शकेल. श्र्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना गोमेकॉत आणून दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू कसा होतो, याचे उत्तर गोमेकॉने द्यायला हवे. तसेच या रुग्णांवर कोणते उपचार केले जातात व त्यांना कोणती सेवा दिली जाते हेही लोकांना कळायला हवे, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
ज्या संशयित कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्यावेळी मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात आला होता काय? याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी द्यायला हवे. सोमवारी पेडणे येथील आणखी एका रुग्णाचा गोमेकॉत संशयास्पद मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर चोडणकर यांनी ही मागणी केली आहे. या मृत्यूंची निःपक्षपातीपणे चौकशी झाल्यास कुठे व कुणाचे काय चुकले होते हे कळू शकणार असून त्याद्वारे आवश्यक ती सुधारणा घडवून आणता येणार असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. कोविड - १९ रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक ते सुरक्षा साहित्य पुरविण्यात राज्य सरकारला अपयश आले असल्याचा जो आरोप करण्यात आला होता त्याचा चौकशीत समावेश केला जावा. गोवा प्रदेश काँग्रेस समितीने मार्च महिन्यापासून डॉक्टर व परिचारिका यांच्यासाठीच्या वैयक्तिक सुरक्षा साहित्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता, असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com