मच्छीमार जेटीवरील कामगारांना कोविड चाचणी बंधनकारक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

मच्छीमार खात्याने १ सप्टेंबर रोजी जेटीवरील कामगारांना कोविड चाचणी बंधनकारक नाही असे संबंधित मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. 

नावेली: कुटबण जेटीवरील कामगारांना कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक, सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर, बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. ममता काकोडकर, तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते. मच्छीमार खात्याने १ सप्टेंबर रोजी जेटीवरील कामगारांना कोविड चाचणी बंधनकारक नाही असे संबंधित मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. 

जिल्हाधिकारी रॉय यांनी मासेमारीला जाताना कामगारांना वैद्यकीय किट, ऑक्सिमीटर, तसेच इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्राने कुटबण जेटीवर आरोग्य समस्या उद्भवू शकते अशी भीती उपस्थित करून चाचणीसंबधी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अशी लेखी मागणी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

परराज्यांतून मासेमारीसाठी गोव्यात येणाऱ्या सर्व कामगारांची आता कोविड चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती बोटमालकांकडून प्राप्त झाली आहे. गेल्या चार पाच दिवसांत बिहार, छत्तीसगड, आंध्रप्रदेश राज्यात कामगारांना आणण्यासाठी गोव्यातून गेलेल्या खासगी बसगाड्या कामगारांना घेऊन गोव्यात परतल्या असल्याची माहिती अखिल गोवा परसींग बोटमालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या