COVID-19 Goa: तिसऱ्या लाटेचा भाजप करणार सामना

गोव्यात (Goa) कोविडची तिसरी लाट आली (COVID-19 third wave), तर त्याचा सामना करण्यासाठी भाजप सज्ज
COVID-19 Goa: तिसऱ्या लाटेचा भाजप करणार सामना
Representative imageTwitter

गोव्यात (Goa) कोविडची तिसरी लाट आली (COVID-19 third wave), तर त्याचा सामना करण्यासाठी व समाजाची मदत करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय भाजपचे (BJP) कार्यकर्ते उपलब्ध असतील. चतुर्थीनंतर (Ganesh Chaturthi 2021) हे कार्यकर्ते आपल्या भागात सर्वेक्षण करून कोविड प्रसारावर नजर ठेवतील अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. (COVID third wave in Goa: BJP ready to battle pandemic)

यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या आरोग्य विभागाचे डॉ. शेखर साळकर, डॉ. स्नेहा भागवत आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर होते. तानावडे म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. दिल्लीतील प्रशिक्षणासाठी डॉ. साळकर, डॉ. भागवत व शर्मद रायतूरकर उपस्थित होते. त्यांनी १५० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित केले. त्यांनी २ हजार ५७१ जणांना प्रशिक्षण दिले आहे.

Representative image
Goa Assembly Election: दक्षिणेतील नेते ठरवणार गोवा काँग्रेसची व्यूहरचना

डॉ. साळकर म्हणाले, तिसरी लाट येणार आहे. तिचा फटका फार बसू नये. कोविड झाल्याचे निदान लवकर व्हावे, जनतेला त्या काळात कोणता आहार घेतला पाहिजे, दिनचर्या कशी असली पाहिजे आणि कोविडमुक्त झाल्यावर जीवनशैली कशी असली पाहिजे याची माहिती हे आरोग्य स्वयंसेवक देतील. ते आपल्या भागातील सर्दी झालेल्याची, ताप येणाऱ्याची माहिती संकलीत करतील. त्याना थर्मल गन कशी वापरावी, दोन मिनिट चालण्याची चाचणी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले आहे.

डॉ. भागवत यांनी सांगितले, की हा पक्षाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोविडच्या लाटेमुळे राज्यात मृत्यू आटोक्यात राहण्यासाठी याची मदत होणार आहे. कोविड झाल्याचे निदान लवकर झाले, तर उपचार देऊन संबंधित व्यक्तीचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे. कुंकळ्येकर म्हणाले, ही सारी माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने संकलीत केली जाणार आहे. कोविडला आटोक्यात आणण्यासाठी कोणत्याही एका भागात केलेल्या उत्तम उपाययोजनेची अंमलबजावणी इतरत्रही केली जाणार आहे.

गर्दीबाबत बोलणे टाळले

यावेळी भाजप पक्षाच्या बैठकांना, दौऱ्यांना होत असलेल्या गर्दीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे लक्ष वेधले असता त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊ असे सांगून गर्दीवर नियंत्रण आणण्याबाबत बोलणे टाळले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com