गोव्यात 45 वर्षांवरील ‘कोविड’ प्रतिबंधक लसीकरण सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

गोवा राज्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी ‘कोविड प्रतिबंधक’ लसीकरण सुरू झाले आहे. त्याचा लाभ गोमंतकीयांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे.

पणजी: गोवा राज्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी ‘कोविड प्रतिबंधक’ लसीकरण सुरू झाले आहे. त्याचा लाभ गोमंतकीयांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे. यापूर्वी आरोग्य क्षेत्रातील व सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना तसेच तसेच 45 वर्षांवरील आजारी व्यक्ती आणि 60 वर्षांवरील नागरिकांना ‘कोविड प्रतिबंधक’ लसीकरण सुरू झाले होते.

आता राज्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. राज्यातील 36 केंद्रांमध्ये हे लसीकरण सुरू झाले असून राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन राणे यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

सोपो कंत्राटदार व मासळी विक्रेता संघटनेमध्ये वाद सुरु आहे         

देशाबरोबरच गोवा राज्यातही आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड ही कोविड प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम सुरू झाली. राज्यातील सरकारी प्राथमिक केंद्रे, शहरी आरोग्य केंद्रे, तसेच जिल्हा इस्पितळ व गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह एकूण 36 ठिकाणी आणि राज्यातील खाजगी इस्पितळातही कोविड प्रतिबंधक लसीकरण उपलब्ध केले आहे. सरकारी केंद्र, सरकारी इस्पितळात मोफत लस देण्यात येत असून खाजगी इस्पितळांमध्ये 250 रुपये शुल्क आकारले जात आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार हे लसीकरण सुरू झाले आहे. 

संबंधित बातम्या