कोविड योद्ध्या परिचारिकांचा रोटरी मिरामारतर्फे सत्कार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

रोटरी क्लब मिरामार या सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. कोविड महामारी काळात गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल मध्ये कोविडग्रस्त रुग्णांची अग्रभागी राहून सेवा करणाऱ्या प्रत्येक वॉर्डमधील १३ परिचारिकांचा रोटरी क्लब मिरामारतर्फे त्यांच्या सेवेची दखल घेऊन सत्कार करण्यात आला

पणजी : रोटरी क्लब मिरामार या सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. कोविड महामारी काळात गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल मध्ये कोविडग्रस्त रुग्णांची अग्रभागी राहून सेवा करणाऱ्या प्रत्येक वॉर्डमधील १३ परिचारिकांचा रोटरी क्लब मिरामारतर्फे त्यांच्या सेवेची दखल घेऊन सत्कार करण्यात आला.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब इंटरनॅशनलचे जिल्हा प्रांतपाल संग्राम पाटील(कोल्हापूर), प्रथम नागरिक उत्कर्षा पाटील, भावी जिल्हा प्रांतपाल गौरीश धोंड, जीएमसी चे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, रोटरी मिरामारचे अध्यक्ष कमलेश अमलानी, उपाध्यक्ष शांतेंदु मोहिते, सचिव डॉ. नोवेल ब्रिटो, संयुक सचिव सागर कुलकर्णी, माजी अध्यक्ष मनिषा सरदेसाई, सोनाली नागवेकर, रोटरी पणजीचे अध्यक्ष कार्लीटो मार्टिन्स उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या