Covid19: गोव्यातील शांतादुर्गा देवीचा उत्सव यंदाही साध्यापणाने

Covid19: गोव्यातील शांतादुर्गा देवीचा उत्सव यंदाही साध्यापणाने
shantadurga.jpg

पणजी : तेथे सालाबादप्रमाणे होणारा शांतादुर्गा नेर्लीकरीण (Shantadurga Temple) देवीचा 109 वा वर्धापन दिन यंदाही साधेपणाने साजरा होणार आहे. केवळ धार्मिक विधी होतील. दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, गेल्या वर्षीपासून कोविड महामारीमुळे (Covid19) उत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. (Covid19 The celebration of Goddess Shantadurga in Goa is still simple)

शांतादुर्गा नेर्लीकरीण देवीच्या वर्धापन दिनाला दरवर्षी प्रार्थना, गणेश पूजा, पुण्यवाचन, कलशस्थापन, शतकलशाभीषेक, नवचंडी हवन आणि आरत्या व महानैवेद्य असे धार्मिक विधी होतात. ते यंदाही होणार आहेत. परंतु, वै राधाबाई (गोकुळताई) व वै.बाळकृष्ण (कृष्णादाद) भाटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाटकर कुटुंबियांकडून आयोजित केले जाणारे मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  

यापूर्वी, भाटकर कुटुंबीय या वर्धापन दिनाला मनोरंजनाचे संगीताचे कार्यक्रमाचे आयोजन करतात. आतापर्यंत या कार्यक्रमात गोव्यातील ख्यातकिर्त कलाकार राजेंद्र पै, डॉ. प्रविण गावकर, डॉ. गौरी भट, पंडित रामदास कामत तसेच झी मराठीवरील सारेगमपच्या कलाकारांनी त्यांची अदाकारी सादर केली आहे. गेल्यावर्षीही हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.  शांतादुर्गा नेर्लीकरीण देवीचा उद्या वर्धापनदिन

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com