राज्यात चोवीस तासांत ४०७ जण पॉझिटिव्ह, तर चार बळी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज १ हजार ५७० जणांचे स्वॅब चाचण्यांसाठी घेण्यात आले. त्यात ४०७ पॉझिटिव्ह आढळले, तर ९२९ निगेटिव्ह आढळले आणि २३४ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.

पणजी: राज्यात कोरोनामुळे मागील २४ तासांत चार बळी गेले. आत्तापर्यंतची बळींची संख्या २९० वर पोहोचली आहे. त्याशिवाय आज ५५३ जण प्रकृती सुधारल्याने घरी गेले, तर आज घेतलेल्या स्वॅब चाचणीत ४०७ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज १ हजार ५७० जणांचे स्वॅब चाचण्यांसाठी घेण्यात आले. त्यात ४०७ पॉझिटिव्ह आढळले, तर ९२९ निगेटिव्ह आढळले आणि २३४ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. २०० जणांना घरगुती अलगीकरणात उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. आजपर्यंत बरे झालेल्यांच्या संख्येने दहा हजारांचा (१०,१२९) टप्पा पार केला आहे. तर एकूण अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५ हजार १७३ वर पोहोचली आहे.

मागील २४ तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये पेडणे येथील ७५ वर्षीय पुरुष, साखळी येथील ८८ वर्षीय महिला, हडफडे येथील ७३ वर्षीय पुरुष आणि आसगाव येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

डिचोली तालुक्यात रविवारी २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. साखळीत २७ रुग्ण, तर डिचोली विभागात एकही रुग्ण आला नाही. मये विभागात केवळ दोनच कोरोनाबाधित आढळले.  डिचोली विभागात १९१, मये विभागात १८६ आणि साखळी विभागात १२८ मिळून तालुक्यात एकूण ५०५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज डिचोलीत ३३, मयेत २२ आणि साखळीत १८ मिळून तालुक्यात ७३ रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या