गोवा: ''भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे देशात कोविडची स्थिती गंभीर''

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

केंद्रातील भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आज देशात परत एकदा कोविडची स्थिती गंभीर झाल्याने लोक भयभीत झालेले आहेत.

मडगाव : केंद्रातील भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आज देशात परत एकदा कोविडची स्थिती गंभीर झाल्याने लोक भयभीत झालेले आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना हाताळणीबद्दल केलेल्या सूचना केंद्र सरकारने मान्य केल्या असत्या तर देशात आज दिलासादायक परिस्थिती दिसली असती, असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. 

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर होण्याच्या तब्बल ४१ दिवस आधी केंद्र सरकारला कोरोना संकटाची सूचना दिली होती व सरकारने या रोगावर गांभीर्याने विचार करावा व देशातील अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी केली होती, असे  कामत यांनी म्हटले आहे. दुर्देवाने केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले व "टाळी बजाव, थाली बजाव, दीया जलाव" उत्सव साजरे करण्यावर भर देत, लोकांना कोविड महामारीत ढकलले. Covids condition in the country is critical due to irresponsibility of BJP government)

गोवा: लॉकडाऊन बद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे महत्वाचे विधान

राहुल गांधी यांनी सातत्याने केंद्रातील भाजप सरकारला कोविड हाताळणी सबंधी बहुमूल्य सल्ले दिले.  मागच्या आठवड्यात राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सरकारकडे इतर कोविड लसीना मान्यता देण्याची मागणी केली होती. परंतु, केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने केंद्र सरकारला राहुल गांधीची सूचना मान्य करण्याची सुबुद्धी आली व त्यांनी रशियेच्या स्पुटनिक व्ही या लसीचा आपत्कालीन वापर करण्यासाठी मान्यता दिली असे कामत म्हणाले. 

भाजप सरकारने आता उत्सवी वातावरणातुन बाहेर यावे  व राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ एप्रिल २०२१ रोजी लिहीलेल्या पत्रातील सात मागण्या  मान्य कराव्यात अशी मागणी  कामत यांनी केली आहे. 
 

संबंधित बातम्या