डिचोलीत दहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या 251 पालकांनी घेतली कोविशिल्ड लस 

GOA CF1.jpg
GOA CF1.jpg

डिचोली:  18  ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांसाठीच्या आयोजित  लसीकरण (Vaccination) कार्यक्रमांतर्गत आज (रविवारी) डिचोली (Dicholi) तालुक्यात  287 जणांनी कोविशिल्ड (Covshield) लस घेतली. आज लस घेतलेल्या नागरिकांमध्ये दहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या 251 पालकांचा तर स्तनपान करणाऱ्या 36 मातांचा समावेश आहे. 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या दिव्यांग व्यक्ती, स्तनपान करणाऱ्या माता, दहा वर्षापर्यंतच्या बालकांचे पालक, रिक्षा, टॅक्सीचालक, मोटरसायकल पायलट, खलाशी, हृदयविकार,  मधूमेही आदी रुग्णांना प्राधान्य देण्यात येत आहे. 

डिचोली तालुक्यात साखळी सरकारी महाविद्यालय, रवींद्र भवन साखळी, नारायण झांट्ये महाविद्यालय क्रीडा संकुल आणि श्री शांतादुर्गा विद्यालय, डिचोली, प्राथमिक आरोग्य केंद्र, मये आणि दयानंद हायस्कुल, चोडण अशी सहा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 

शांतादुर्गात प्रतिसाद
आज लसीकरणावेळी शहरातील श्री शांतादुर्गा (Shantadurga) विद्यालय केंद्रात 87,  साखळी महाविद्यालय केंद्रात 63,  पालकांनी लस घेतली. मये प्राथमिक आरोग्य केंद्रात 38, झांट्ये  महाविद्यालय केंद्रात 33, साखळी रवींद्र भवन केंद्रात 23 आणि दयानंद हायस्कुल केंद्रात 7  केंद्रात मिळून तालुक्यात दहा वर्षापर्यंत बालक असलेल्या 251 पालकांनी लस  घेतली. स्तनपान करणाऱ्या 36 मातांनी लस घेतली त्यात साखळी रवींद्र भवन केंद्रात 32 जणांचा समावेश आहे. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राची आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर,  साखळी सामाजिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम देसाई  आणि मये प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य अधिकारी डॉ. सिद्धी कांसार यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली तालुक्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com