गोड्या पाण्यातील मासळी खाण्याच्या क्रेजमुळे गोव्यात मत्स्यपालनात होतेय वाढ

fisheries.jpg
fisheries.jpg

सासष्टी: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तसेच एकात्मिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers) प्रोत्साहन देण्यात येत असून सध्या शेततळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य पालन करण्यासाठी राज्यातील अनेक शेतकरी पुढे येत आहेत. गोव्यात (Goa) गोड्या पाण्यातील मासळी (Fish) खाण्यास खवय्यांना क्रेज असल्यामुळे या मासळीसाठी भरपूर मागणी येत असून गोव्यात मत्स्यशेतीमध्येही वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या वर्षी मत्स्यव्यवसाय (Fisheries) विभागाकडून शेतकऱ्यांनी 7.5 लाख मासळीचे बीज खरेदी केले होते तर यंदा 8 लाखांच्या वर मासळीचे बीज वितरित करण्याचे लक्ष्य मत्स्यव्यवसाय विभागाने ठेवले आहे. (Craze for freshwater fish has led to an increase in fisheries)

शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारद्वारे विविध योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी एकात्मिक शेती करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. एकात्मिक शेतीअंतर्गत शेतकरी शेतीबरोबरच मत्स्यपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन आदी व्यवसाय करीत असून मत्स्यपालन करण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येत आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात शेतकरी मासळीचे बीज खरेदी करीत असून शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्यामुळे मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होते आहे. शेतीबरोबर मत्स्यपालन केल्यास शेतकऱ्यांना नफा होणार त्याबरोबरच एकात्मिक शेतीलाही यातून प्रोत्साहन मिळणार, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे अधीक्षक चंद्रेश हळदणकर यांनी दिली. 

उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन करण्यात येत असून दक्षिण गोव्यात 70 टक्क्यांच्या आसपास गोड्या पाण्यातील मासळीचे बीज वितरित करण्यात येत आहे. सासष्टी तालुक्यातील  माकाझान, लोटली, मायणा व कुडतरी भागात अनेक शेतकरी मत्स्यपालन करण्यासाठी पुढे येत आहे. शेतकऱ्यांसाठी यंदा 8 लाख मासळी बीज आणण्यात येणार असून शेतकऱ्यांची मागणी वाढल्यास शेजारील राज्यातून मासळीचे बीज आयात करण्यात येणार आहे, असे चंद्रेश हळदणकर यांनी सांगितले. 

केरी येथील मत्स्यपालन विभागाच्या मत्स्य बीज उत्पादन केंद्रातून गोड्या पाण्यातील मृगल, सिप्रिनस, रोहू आणि कटला आदी मासळीचे बीज ३० पैसे प्रति बीज विकत घेऊन दक्षिण गोव्यातील दहा शेतकऱ्यांना एक हजार बीज वितरित करण्यात येत असून गोड्यापाण्यातील मासळीची शेती करण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शेततळी उभारून देण्यात येत असून सिंचन तसेच मत्स्यपालनही करण्यासाठी करू शकतात, अशी माहिती कृषी केंद्राचे तज्ज्ञ हृषीकेश पवार यांनी दिली.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com