सांगेसाठी स्वतंत्र आधारकार्ड केंद्र बनवा

सांगेसाठी स्वतंत्र आधारकार्ड केंद्र बनवा
सांगेसाठी स्वतंत्र आधारकार्ड केंद्र बनवा

कुडचडे: सांगे आणि केपे तालुक्यासाठी कुडचडे येथे एकच आधार कार्ड बनविण्यासाठी केंद्र असल्याने नेहमीच या केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. सांगे हा भौगोलिक दृष्टीने मोठा तालुका असूनही स्वतंत्र आधार कार्ड केंद्र उघडण्यात आले नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत असून नागरिकांची होणारी फरफट थांबविण्यासाठी सांगेत नवीन केंद्र उघडण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. 

कुडचडे रेल्वे स्थानका जवळ असलेल्या या आधारकार्ड केंद्रात नेहमीच गर्दी असते. नवीन कार्ड असो किव्हा कार्ड दुरुस्ती खेपा या माराव्या लागतात. बारीक सारीक दुरुस्ती साठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असते. एखाद्या दुरुस्ती साठी तारीख दिली जाते ती किमान महिना भरा नंतरची. मग दुरुस्ती असो किव्हा नवीन कार्ड ते हाती लागे पर्यंत सहज दोन महिने घालवावे लागतात. कुडचडे हे शहर आणी त्याला जोडून दोन ग्रामपंचायत क्षेत्र पाहता नागरिकांना कमी त्रासाचे आहे. आणी तेच काम सांगे तालुक्यातील वेर्ले किव्हा साळजीणी सारख्या गावातील नागरिकांचे असल्यास साळजीणी ते कुडचडे आणि परत हे अंतर एकशे दहा कि.मी.चे आहे आणि काम न झाल्यास दिवस वाया जात असतो. 

या केंद्रात सांगे किव्हा केपे तालुका साठी वेग वेगळ्या रांगा नसतात. एकाच रांगेत ताटकळत राहावे लागते. साहजिकच कुडचडे शहरात केंद्र असल्याने शहर किव्हा आसपास चे नागरिक सकाळीच रांगा लावतात आणी कोविड महामारीत प्रवासी बस गाड्या उपलब्ध नसल्याने दूर वरून येणाऱ्या नागरिकांना नेहमीच माघे राहावे लागत आहे. इतकं करूनही एकाच वेळी काम होणार याची खात्री नसते. सांगेतील जनतेला होणाऱ्या त्रासातून सुटका होण्यासाठी शासनाने सांगे साठी स्वतंत्र आधार कार्ड केंद्र तयार करण्याची मागणी होऊ लागली आहे. 

या पूर्वीही सांगेत आधारकार्ड केंद्र सुरु करण्यासाठी नागरिकांनी सरकारला लेखी निवेदन देण्यात आले होते पण अद्याप काहीच हालचाली करण्यात आलेल्या नाही.सांगेतील जनतेला अत्यंत आवश्यक अश्या आधारकार्ड बनविण्यास जे त्रास सहन करावे लागतात ते पाहता सरकारने विनाविलंब केंद्र सुरु करण्याची मागणी या पूर्वी सांगेचे समाजसेवक मेशु डिकॉस्ता यांनी केली होती पण अद्याप सरकार या गोष्टीचा विचार करीत नसल्याने नागरीकातून नाराजी व्यक्त होत आहे.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com