पतसंस्थांनी ग्राहकांचा विश्‍वास संपादन करावा

 Credit unions should earn the trust of customers
Credit unions should earn the trust of customers

फोंडा : मेहनत आणि काबाडकष्ट करून ग्राहक आपले पैसे बॅंकात जमा करतो. हे पैसे त्याच्या भविष्याची पुंजी असते. त्यामुळे अशा ग्राहकाचे पैसे सुरक्षित राहणे महत्त्वाचे असून विशेषतः अर्बन पतसंस्थांनी ग्राहकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी अधिक चांगले कार्य करावे, असे आवाहन सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी केले. 


कुर्टी - फोंड्यातील सहकार भवनात काल (२८ रोजी) गोवा राज्य सहकार संघातर्फे राज्य सरकारच्या सहकार निबंधक खात्याच्या सहकार्याने अर्बन पतसंस्थांना ‘ओटीएस’ या योजनेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला एकशे पंधराजणांनी उपस्थिती लावली. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री गोविंद गावडे तसेच सहकार निबंधक बिजू नाईक, गोवा राज्य सहकार संघाचे अध्यक्ष उदय प्रभू, उपाध्यक्ष भिसो गावस आदी मान्यवर उपस्थित होते.


गोविंद गावडे यांनी अशाप्रकारच्या उपक्रमाचे कौतुक करताना सहकार क्षेत्रातील पतसंस्थांना विविध बाबींवर मार्गदर्शन केले तर ग्राहकांना अधिक चांगली सेवा या पतसंस्था देऊ शकतात. राज्याच्या आर्थिक जडणघडणीत या पतसंस्थांचा महत्त्वाचा सहभाग असून विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकाला या पतसंस्था उपयुक्त ठरल्या आहेत. पतसंस्था असो वा बॅंका प्रत्येकाने मात्र कर्ज देताना काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमित रुपात कर्जाचे हप्ते भरले तर कर्ज थकत नाही. त्यामुळे ग्राहक आणि बॅंका अथवा पतसंस्थांन ते सोयिस्कर ठरते, म्हणून कर्जाच्याबाबतीत प्रत्येक पतसंस्थेने सजगता बाळगावी, असे आवाहन गोविंद गावडे यांनी केले. सहकार भवनामार्फत सहकार संघाच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही गोविंद गावडे म्हणाले. 
सहकार निबंधक बिजू नाईक यांनीही अशाप्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करणे महत्त्वाचे असून कर्ज वितरण आणि कर्जफेडीच्याबाबतीत सजगता बाळगा असे आवाहन केले. 


यावेळी सहकार खात्यातर्फे मंगेश फडते तसेच राजू मगदूम यांनी कर्जफेडीबाबतच्या "ओटीएस'' योजनेसंबंधी उपयुक्त माहिती दिली. गोवा राज्य सहकार संघाचे संचालक ऑगस्टो डिकॉस्टा यांनी सूत्रसंचालन केले तर संघाचे उपाध्यक्ष भिसो गावस यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com