क्राईम ब्रँचच्या कारवाईत टोनी जुआंव फर्नांडिसला अटक;  ६० ग्रॅम चरस जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

हणजूण रेव्ह पार्टी आयोजित करणारा संशयित कपिल झवेरी याच्याशी त्याचे लागेबांधे असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली. 

पणजी: हणजूण येथील रेव्ह पार्टीसाठी ड्रग्जचा पुरवठा केल्याचा संशय असलेल्या टोनी जुआंव फर्नांडिस याला काल सीआयडी क्राईम ब्रँचने कळंगुट येथे अटक केली. पोलिस पथकाने घातलेल्या छाप्यावेळी त्याच्याकडून उच्च दर्जाचा ६० ग्रॅम चरस जप्त केला असून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये या ड्रग्जची किंमत सुमारे ९० हजार रुपये. 

हणजूण रेव्ह पार्टी आयोजित करणारा संशयित कपिल झवेरी याच्याशी त्याचे लागेबांधे असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली. 

गेल्या काही दिवसांपासून क्राईम ब्रँचचे पथक त्याच्या मागावर होते. कळंगुट येथे तो असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल परब याच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. ड्रग्ज पुरवठा करण्याचा संशय असलेल्या टोनी फर्नांडिसची पाळेमुळे शोधून काढण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या