Crime Branch: गोवा वेल्हा येथे 2 लाखाचा गांजा जप्त; एकाला अटक

पोलिसांनी 2 किलो गांजा केला जप्त
Drug Accused Arrested by porvorim police
Drug Accused Arrested by porvorim policeDainik Gomantak

काही तासापुर्वी गोवा पोलिसांनी अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आता गोवा वेल्हा येथे कारवाई करत पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(Crime branch arrests Clismon Francis Pires for allegedly being in possession of ganja at Goa Velha)

Drug Accused Arrested by porvorim police
NCB Crackdown: अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई, रशियन महिला व ब्रिटिश नागरिकाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार गोवा वेल्हा येथे एक व्यक्ती अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरुन सापळा लावत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. क्लिसमन फ्रान्सिस पायर्स ( Clismon Francis Pires ) असे या संशयिताचे नाव असून कारवाईदरम्यान त्याच्याकडून सुमारे सुमारे 2.10 लाख रुपये किमतीचा 2 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

Drug Accused Arrested by porvorim police
Rohan Khaunte Statement on IIT: नवे आयटी उद्योग राज्यासाठी वरदान ; राज्याच्या आयटी क्षेत्राला एक नवी गती मिळेल

या प्रकरणात पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच संशयिताचा आणखी काही प्रकरणात समावेश आहे का? याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.

दरम्यान शिवोली, अन् म्हापसा येथे अमली पदार्थ विक्री प्रकरणात एक रशियन महिला व एका ब्रिटीश नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडेचार लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com