Mapusa: फेक कॉल सेंटर प्रकरण! नगरसेवक तारक आरोलकर यांची अटक आणि सुटका

बार्देश तालुक्यात कोलवाळ येथे मंगळवारी (दि.11) बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला.
Tarak Arolkar
Tarak ArolkarDainik Gomantak

बार्देश तालुक्यात कोलवाळ येथे मंगळवारी (दि.11) बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला. ज्या ठिकाणी हे बेकायदा कॉल सेंटर चालवले जात होते. ती जागा नगरसेवक तारक आरोलकर (Tarak Arolkar) यांच्याशी संबधित असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, याप्रकरणी आरोलकर यांना रविवारी (दि.16) पहाटे अटक करण्यात आली व नंतर जामिनावर सुटका देखील करण्यात आली.

कोलवाळ येथील बेकायदा कॉल सेंटरप्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखाने 33 जणांना अटक केली. तसेच, 26 संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले होते. दरम्यान, ही जागा तारक आरोलकर यांच्याशी संबधित असल्याने खळबळ निर्माण झाली होती.

रविवारी आरोलवर यांना पहाटे अटक करण्यात आली, त्यानंतर म्हापसा न्यायालयाकडून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. आरोलकर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँगेसचे उमेदवार होते.

Tarak Arolkar
Colvale Crime: कोलवाळ येथे परप्रांतीय चालवत होते बेकायदा कॉल सेंटर; क्राईम ब्रँचकडून 33 जणांना अटक

तारक आरोलकर यांचे याप्रकरणात नाव समोर आल्यानंतर ही जागा माझ्याशी संबधित असली तरी ती भाडेतत्वावर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

गुजरातचा व्यवस्थापक

बेकायदा कॉल सेंटरचा व्यवस्थापक हा मूळचा गुजरातचा आहे. तर उर्वरीत कर्मचारी इतर राज्यांमधील आहेत. हे सर्वजण अमेरिकेतून बोलत असल्याचे दाखवले जात होते. तसेच अॅमेझॉन या ई कॉमर्स संकेतस्थळ कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून अनेकांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com