पर्वरीतील वेश्याव्यवसायाचा क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश

पर्वरी पोलिसांनी केली एका युवतीची सुटका
Crime Branch exposes prostitution in Porvorim
Crime Branch exposes prostitution in PorvorimDainik Gomantak

गोव्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अमली पदार्थांची तस्करी, मद्याचा अवैध साठा, मारामारी, खून आणि अत्याचाराच्या घटना आता रोजच्या बनल्या आहेत. महिलांवर होणारे अत्याचार अजूनही पूर्णपणे थांबले नाहीत. अशातच आता पर्वरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.

पर्वरीतील चोघम रोड येथे सुपर मार्केटमधून वेश्याव्यवसाय चालवला जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच याठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी (police) एका युवतीची सुटका केली आहे. यावेळी पवन कुमार पंडित व परशुराम चालवाडी या दोन संशयित दलालांना पर्वरी (Porvorim) पोलिसांनी अटक केली आहे. पर्वरीत चालवण्यात येणाऱ्या वेश्याव्यवसायाचा क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime Branch exposes prostitution in Porvorim
...म्हणून तिने रक्ताने बनवली 'द काश्मीर फाइल्स'ची पेंटिंग

दरम्यान, यावेळी पर्वरी पोलिसांनी एका युवतीची सुटका केली आहे. पवन कुमार पंडित व परशुराम चालवाडी या दोन संशयित दलालांना अटक करून पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राइम ब्रॅंच (Goa Crime Branch) पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी सांगोल्डा येथे वेश्याव्यवसाय प्रकरणी घातलेल्या छाप्यात वेश्या दलाल अफिझ सय्यद बिलाल (37) याला काही दिवसांनपूर्वी अटक केली होती. त्याने ग्राहकांना देण्यासाठी आणलेल्या तीन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. या तिन्ही महिला महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील होत्या. यातील एका महिलेने टिव्ही चॅनलवर काम केलेले आहे. यामध्ये अजूनही महिला अडकल्या आहेत का याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. अशातच पर्वरीतील हे प्रकरण समोर आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com