Goa Crime: गोव्यातील परप्रांतीयांच्या झोपड्यांना आमदारांचा आशीर्वाद!

परप्रांतीय लोक गोव्यात येत असल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे.
Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak

परप्रांतीयांचे लोंढे गोव्यात येत असल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी परप्रांतीयांच्या झोपडपट्टीला स्थानिक आमदारांचा आशीर्वाद असल्याने या गुन्हेगारीला तेच जबाबदार आहेत. रात्रीच्या वेळी काही गाडे तसेच रेस्टॉरंट्मध्ये ड्रग्सची खुलेआम विक्री होत आहे. त्याची पोलिस तसेच अन्न व औषध प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने केली आहे.

पक्षप्रमुख मनोज परब आणि सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी आज पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेविषयी परब म्हणाले की, ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्यास त्यांच्यावरच पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातात. यावेळी पोलिस महासंचालकांनी असे प्रकार पुन्हा होणार नाही, असे आश्‍वासन दिले.

Manoj Parab
Goa Congress MLA| काँग्रेस आमदार सज्ज; मात्र 'या' कारणामुळे लांबणार भाजपप्रवेश

सांत आंद्रे मतदारसंघातील आगशी पोलिस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गस्त वाढवून येथील पोलिस स्थानकात महिला उपनिरीक्षकाची नेमणूक करावी, अशी विनंती महासंचालकांना केली आहे.

गुन्हेगारांची ओळख गुप्त: यापुढे गुन्हेगारांची माहिती जमा करून ती पोलिस महासंचालकांना सादर केली जाईल. लोकांना जर पोलिसांकडे गुन्हेगार वा ड्रग्स विक्रेत्यांची माहिती दिल्यास त्यांची नावे उघड होतील अशी भीती वाटत असेल तर त्यांनी आपल्याशी किंवा आमदार बोरकर यांच्याशी संपर्क साधावा. त्यांची नावे गुपित ठेवली जातील, असे परब यांनी सांगितले.

Manoj Parab
Goa पोलिसांची धडक मोहिमेची शक्यता, ड्रग्स डिलरसह रेती माफिया पोलिसांच्या रडारवर

यावेळी बोरकर म्हणाले की, आगशी पोलिस स्थानकात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. पोलिसांना वाहतूक नियंत्रण व इतर कामासाठी जुंपल्याने या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बांबोळी ते झुआरी पूलदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक वाढली असून येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमण्याची आवश्‍यकता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com