दक्षिण गोव्यात गुन्हेगारीचा आलेख चढाच

पोलिसांसमोर आव्हान गुन्हेगारीला आळा घालण्याच: सहा महिन्यांत 13 खून, 15 बलात्कार, 18 अपहरणांची नोंद
Crime
CrimeDainik Gomantak

मडगाव: दक्षिण गोव्यात पुन्हा गुन्हेगारीची प्रकरणे वाढू लागली आहेत. गत जानेवारीपासूनच्या सहा महिन्यांत झालेले तेरा खून, पंधरा बलात्कार व अठरा अपहरण प्रकरणांवरूनच हे स्पष्ट होत असून, पोलिस यंत्रणेसमोरील आव्हान बनले आहे.(Crime rate increased in South Goa )

Crime
Smriti Irani : स्मृती इराणींच्या मुलीचं 'ते' हॉटेल बेकायदेशीरच

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 580 प्रकरणांचा (89.75%) छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले आहे, मात्र गुन्हेगारीचे प्रकार वाढले असल्याने पोलीसांनी ही आता गती वाढवल्यास नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.

आता विश्वास कोणावर ठेवावा ?

झालेल्या गुन्ह्यात घरफोड्या, खून, अपहरणे व बलात्कार यांचा जास्त भरणा असून, त्यामुळे नागरिकांत चिंता वाढली आहे. क्षुल्लक कारणावरून मित्राने वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला बोलावले नाही म्हणूनही खुनाची घटना घडली.

लीफ्ट देण्याचा बहाणा करून नंतर दागिन्याच्या हव्यासातून सावर्डे झालेल्या खुनामुळे आता विश्वास कोणावर ठेवावयाचा? असा प्रश्न नागरिकांना ही पडू लागला आहे. तसेच अल्पवयीन मुलींचे अपहरण, लैंगिक अत्याचार ही तर सर्वाधिक चिंतेची बाब ठरलेली आहे. मुलींच्या पालकांची झोप या प्रकरणामुळे नाहीशी झालेली आहे.

Crime
Goa Corona Update: गोव्यात आज 150 कोरोना रूग्णांची नोंद, सक्रिय रूग्णसंख्या 737

पोलिसांना हवे नागरिकांचे सहकार्य

पोलिस यंत्रणेला विविध प्रकरणाबरोबरच बलात्कारासारख्या घटनेतही संबंधितांच्या पालकांकडून योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे तपास भरकटतो व त्याचा फायदा संशयितांना मिळतो, असेही पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. काही वेळा पोलिसांवर पक्षःपाताचा आरोप होतो. पण पोलिस आपल्यापरीने तपास करत असतात व त्यांना लोकाचे योग्य सहकार्य हवे असते परंतु बऱ्याचदा ते मिळत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com