गुन्हेगार कुणीही असो तो गुन्हेगारच असतो : किशोर राव

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

गुन्हेगार हा कुठल्याही समाजाचा अथवा धर्माचा असो, गोव्याचा अथवा परप्रांतीय असो तो गुन्हेगारच असतो त्या गुन्हेगाराचे समर्थन करणे हा सुद्धा गुन्हांच आहे. 

शिवोली: गुन्हेगार हा कुठल्याही समाजाचा अथवा धर्माचा असो, गोव्याचा अथवा परप्रांतीय असो तो गुन्हेगारच असतो त्या गुन्हेगाराचे समर्थन करणे हा सुद्धा गुन्हांच आहे. 

हणजुणातील वखारी चालकावर झालेला हल्ला मग तो कुठल्याही कारणांसाठी असो तो एक भ्याड हल्ला होता त्या हल्ल्याचा राष्ट्रीय समाज पक्ष निषेध करत आहे  असे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किशोर राव यांनी हणजुणात स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान,  चिवार-हणजुण येथील वखारीवर हल्ला करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या सर्वच्या सर्व संशयित आरोपींना चार तासांच्या आत गजाआड करण्यात यश मिळवीणार्या हणजुण पोलिस पथकाचा राष्ट्रीय समाज पक्षाकडून पुषगुच्छ प्रदान करीत सन्मानित करण्यात आले.   एकेकाळी गोवा हा आदरतिथ्यांसाठी जगाच्या कानाकोपऱ्यात मानला जात होता. परंतु आज ही परिस्थिती राहिलेली नाही मात्र यामागचे कारण शोधून काढणे, गुन्हेगारांवर वचक ठेवणे हे सरकारचे काम आहे, पोलिस दल आपले काम यथासामर्थ्य करीत आहे, हणजुण हल्ल्यामागील स्थानिक आंतोनियो डिसौझा तसेच कुटुंंबीय आणी इतरांना अवघ्या चार तासांत जीवावर उदार होऊन गजाआड करण्यात यश मिळविलेल्या हणजुण पोलिसांचा राज्य पातळीवर जाहिररित्या  गौरव समारंभ झाला पाहिजे असे किशोर राव यांनी शेवटी सांगितले. 

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष किशोर राव यांनी पटेल समाजाचे नेते अशोक पटेल यांच्या समवेत हणजुण पोलिस स्थांनकाला सोमवारी संध्याकाळी भेट घेत हणजुण हल्ला प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यात प्रमुख भुमीका निभावणार्या पोलिस निरीक्षक सुरज गांवस, उपनिरीक्षक विदेश पिळगांवकर, तसेच तरल यांच्यासह एकुण दहा पोलिस कर्मचार्यांचा पुषगुच्छ देऊन सन्मानित केले.

संबंधित बातम्या