कोरोनाचे संकट आणि आयुर्वेद

कोरोनाचे संकट आणि आयुर्वेद
कोरोनाचे संकट आणि आयुर्वेद

प्रश्न : अनेकांना असे वाटते की, आयुर्वेदात कोणत्याही आजारासाठी ठोस औषधे नाहीत व तो चमत्कारावर आधारलेला आहे. जगभरात तो प्रकर्षाने दिसत नसल्याने आयुर्वेदाचा उदय कसा झाला?
  आयुर्वेदाची महती कळण्यासाठी त्याचा इतिहास समजून घेणे आवश्‍यक आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी म्हणजे दोन व तीन शतकांपूर्वी हिमालयातील गुहांमध्ये भारतातील ऋषीमुनींचे एक संमेलन भरले होते. अनेक मैल चालत भारतातील अनेक ऋषीमुनी या संमेलनाला उपस्थित होते. मानवाला विकारांपासून दूर करणे, हा संमेलनाचा मुख्य विषय होता. त्यावेळी आयुर्वेदाचार्य असलेले आत्रेय पुनर्वसू हे ऋषी उपस्थित होते. त्यांचे शिष्य अग्नीवेश ज्यांनी या आयुर्वेद संमेलनातील चर्चा करण्यात आलेले विषयांचे संकलन केले आणि त्यातून आयुर्वेद शास्त्राचा उदय झाला.

ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात आयुर्वेदिक औषधांमधील वनस्पती, जडी बुटी यावर अभ्यास व वापर यावर सखोल संशोधन करणे सुरू होते व हे ज्ञान संपूर्ण भारतखंडात पसरले होते. सम्राट अशोकाचे त्यावेळी साम्राज्य भारतखंडात असल्याने त्यांनी आयुर्वेद संशोधन, वापर यासाठी खास निधी तयार केला व आज मोफत उपचार पद्धती सर्रासपणे वापरली जाते त्याचा उदय सम्राट सोकाने केला होता.

इतिहास साक्ष आहे की, ख्रिस्त पूर्व ४०० ते १०० वर्षे अनेक ऋषीमुनी नियमितपणे भारतात वैद्यकीय संशोधन व चाचण्या घेत होते. यातूनच पुढे चरकाचा जन्म झाला ज्याने चरकसंहिता नावाचा लिहिला. आजही चरकसंहिता अनेक रोग विकारांसाठी प्रमाण शास्त्र मानले जाते. चरकाच्या काळातच भारतीय वैद्यकशास्त्र खूपच विकसित झाले होते आणि मानसोपचार, पेडीएट्रीक्स, गायनॅकॉलॉजी, नाक कान व घसा, नेत्रचिकित्सा, शस्त्रक्रिया, टॉक्सिकॉलॉजी, व्हर्टीलिटी व फर्टिलिटी असे आठ विभाग विकसित झाले होते.

सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीत आयुर्वेद शास्त्राला बळकटी आली. आचार्य नागार्जुनासह अनेक आयुर्वेदाचार्य यांनी या शास्त्राच्या विकासासाठी मुलभूत व मौलिक योगदान दिले. पंधराव्या शतकाच्या अखेरीस आयुर्वेदाची अधोगती सुरु झाली कारण भारतातील अनेक राज्ये युद्धांमध्ये गुंतत चालली आणि त्यांच्यात फूट पडली. विविध विद्यापीठांचा नाश केला गेला आणि त्यात अनेक मौल्यवान ग्रंथ नष्ट करण्यात आले. अनेक आयुर्वेदाचार्य देशोधडीला लागले व एकूणच आयुर्वेदाची अधोगती झाली.
२०व्या शतकाच्या सुरवातीला युरोपमधील डॉक्टर्स आणि भारतीय डॉक्टरांना आयुर्वेदातील बहुगुणी वैद्यकशास्त्राचा साक्षात्कार झाला व त्यांनी या शास्त्राचा पुन्हा अभ्यास सुरू केला. १९९२ पासून जागतिक आरोग्य संघटनेने आयुर्वेद हे पर्यायी वैद्यकशास्त्र असल्याचे मान्य करीत तसे जाहीर केले. तेव्हापासून पाश्‍चिमात्य जगताने यकृत संरक्षण व इतर विकारांवरील उपचारांसाठी आयुर्वेदाचा लाभ घेण्यास सुरवात केली कारण ॲलोपॅथीमध्ये यावर अजूनही औषध विकसित करण्यात आलेले नाही.

आज भारतात २५० महाविद्यालयांमध्ये सुमारे ४०,००० विद्यार्थी आयुर्वेदाचे शिक्षण घेऊन बीएएमएस ही पदवी घेत आहेत. त्याशिवाय अनेक महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी व त्यापुढील शिक्षणाची सोय आहे.

प्रश्न : आयुर्वेद व अलोपॅथीमध्ये मुलभूत फरक काय आहे?
आत्रेय पुनर्वसू, अग्नीवेश आणि चरक हे आयुर्वेदाचे मूळ आचार्य मानले जातात व त्यांनी प्रतिबंधात्मक औषधांवर भर दिला होता. मानवी शरीरात स्वतःची प्रतिकार शक्ती असावी व ती ती इतकी सजग असावी की कोणत्याही रोग-विकाराने शरीरावर परिणाम करण्यापूर्वी संपूर्ण प्रतिकार केला जावा. प्रतिकार शक्ती हेच सर्वोत्तम बलस्थान व औषध आहे, यावर या तिन्ही आचार्यांचा विश्‍वास व श्रद्धा होती व तोच मुलभूत फरक आहे.

प्रश्न : तुमचे शिक्षण सर्वस्वी वेगळे असूनही आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करावी व स्वतःचा व्यवसाय करावा हे तुम्ही कसे ठरविले?
  मुंबईत १९७० मध्ये केमिकल टेक्नॉलॉजी शिकत असताना मला काविळ झाली. वसतीगृह प्रमुखांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेच व गोव्यात घरी कळवले. तातडीने माझे ज्येष्ठ बंधू मडगावातील आयुर्वेद वैद्यांकडून औषध घेऊन मुंबईला आले. त्या औषधाने मी चार दिवसांत बरा झालो. व कॉलेजला जायला लागलो. तेव्हापासून आयुर्वेदावरील माझा विश्‍वास वाढला आणि या औषधांना नीट पॅक करून त्यांचे मार्केटींग झाले पाहिजे असे माझ्या मनाला ठरवले. २० वर्षे काम केल्यावर १९९७ मध्ये मी माझा लहान व्यवसाय चालू केला व आयुर्वेदिक औषधांची निर्मिती चालू केली. त्याकाळात आयुर्वेदिक औषधांना प्रचंड मागणी येऊ लागली व दरवर्षी २६ टक्के वाढ होत होती. आज आमची कंपनी आयएसओ ९००१ः२००५ प्रमाणित आहे व भारत आणि परदेशातील बाजारात २५ उत्पादने पाठवत आहोत.

प्रश्न : संपूर्ण विश्‍व ‘कोविड-१९’च्या प्रभावाने ग्रासले आहे. आयुर्वेद यासाठी उपयोगी पडू शकेल का?
  निश्‍चितच आयुर्वेदाचा उपयोग होईल. कारण शरीराची प्रतिकार शक्ती चंगली असल्यास विकारावर मात करता येते हे सर्व वैद्यकशास्त्रांनी मान्य केले आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा वापर कोरोना चिकित्सा व उपचारांमध्ये केल्यास कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकतो. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनान वा अन्य कोणत्याही वैद्यकशास्त्राने कोरोनाबाधितांना संपूर्ण बरे केल्याचे ऐकिवात नाही. अनेक ॲलोपॅथिक व आयुर्वेदिक कंपन्यांनी त्यांच्या औषधांच्या चाचण्या हाती घेतल्या आहेत. या चाचण्या २५-४५ वयोगटातील व प्रथामिक टप्प्यात कोरोना झालेल्यांवर केल्या जात आहेत. हे रुग्ण तसेही बरे होऊन घरी जातील. पन्नास वर्षांवरील व जे ऑक्सिजन वा व्हेंटीलेटरवर आहेत त्यांना नीट बरे होतील याची खात्री करणारे उपचार हवे आहेत आणि जर असे उपाय सापडले तर जगासाठी तो फार मोठा दिलासा होईल.
जोपर्यंत आपल्याला संपूर्ण उपचार मिळत नाहीत तोपर्यंत आपली प्रतिकार शक्ती वाढवणे हे आपल्या हातात आहे व ते आयुर्वेदाने शक्य आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांच्या एका अधिसूचनेद्वारे राज्य एफडीए कडून खास परवान्याखाली आयुर्वेदिक औषधे उत्पादन कंपन्यांनी उत्पादित केलेल्या एका औषधाची शिफारस केली आहे. ‘आयुष क्वाथ’ असे याचे नाव आहे व ते एक इम्युनिटी बूस्टर आहे. त्यात तुळशी, दालचिनी, आले व काळी मिरी आहे. नेहमीच्या चहाप्रमाणे ‘आयुष क्वाथ’ उकळवून तो नियमितपणे घ्यावा, अशी शिफारस केली आहे.

प्रश्न : या कोरोना काळात लोकांना उपयोगी होतील अशी कोणतीही अन्य उत्पादने आहेत का ?
  होय, आयुष क्वाथ बरोबरच गिलोई पावडर जी गुळवेलीपासून तयार केली आहे तिचा चांगला उपयोग होईल. या दोन्ही उत्पादनांना महाराष्ट्र सरकारने खास परवाना दिला आहे. ही दोन्ही उत्पादने नियमितपणे वापरल्यास प्रतिकारशक्ती वाढते. म्हणून कोरोनावर अंतिम उपाय मिळेपर्यंत ही उत्पादने वापरावीत आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवावी व तेच आपल्या हातात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com