‘देमानी’च्या लाकडी साहित्यावर संकट

तुकाराम गोवेकर
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

नवविवाहित जोडप्यांना गणेश चतुर्थी निमित्त गोव्यात ‘वजें’ देण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र,या वर्षी कोरोनामुळे अनेकांचे ठरलेले विवाह पुढे ढकलण्यात आले मात्र, याच परिणाम देमानी-कुंकळ्ळी येथील लाकडी वस्तू तयार करणाऱ्या चितारी कुटुंबीयांना व्यवसायावर झाला आहे.

तुकाराम गोवेकर
नावेली, 

नवविवाहित जोडप्यांना गणेश चतुर्थी निमित्त गोव्यात ‘वजें’ देण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र,या वर्षी कोरोनामुळे अनेकांचे ठरलेले विवाह पुढे ढकलण्यात आले मात्र, याच परिणाम देमानी-कुंकळ्ळी येथील लाकडी वस्तू तयार करणाऱ्या चितारी कुटुंबीयांना व्यवसायावर झाला आहे. कोरोनामुळे गेल्या चार महिन्यात व्यवसायाचे मोठे नुकसा झाले, जत्रा, उत्सव बंद झाले आणि आतासुद्धा कोणतीच फेरी, बाजार सुरू नाही, त्यामुळे अर्थचक्रमच बिघडले आहे, अशी माहिती कारागिर निलेश चितारी यांनी दिली.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे संपन्न होत असल्याने यांच्या लाकडी पाटांना मोठी मागणी होती. केवळ गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुमारे ८ हजारांवर लाकडी पाटांची विक्री होत असे. परंतु यंदा कोरोना संकटामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. कोरोनामुळे २२ मार्चपासून कुठेही आपला माला विक्री झाला नाही, सगळ्या जत्रा, उत्सवावर बंदी असल्याने मोठे नुकसान झाले. जांबावलीचा गुलाल, शिरगाव येथील श्री देवी लईराईची जत्रा, म्हापसा येथील मिलाग्रीन सायबिणीचे फेस्त, मडगाव पुरुमेताचे फेस्त, काकोडा मारूती गडावरील जत्रा, पर्तगाळी येथील रामनवमी उत्सव, कोलवा फेस्त, कोरोनामुळे यंदा न साजरे केल्यामुळे फेरी भरली नाही. तसेच आमच्या मालाला खरी मागणी असते, ती म्हणजे वास्को येथील श्री दामोदर सप्ताह, नार्वे येथील अष्टमीची फेरी, चतुर्थीनिमित्त पणजी येथे भरणारी फेरीतही आम्हाला दरवर्षी चार पैसे कमावता येत होते. परंतु यंदा कोरोनामुळे आमचे आर्थिकचक्र बंद पडले आहे, असे चितारी म्हणाले.
देमानी-कुंकळ्ळीत चितारीबंधूंची पाच ते सहा कुटुंबे आहेत, त्यातील तीन ते चार कुटुंबे लाकडापासून वस्तू बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात.
लाकडापासून पाट, आडोळी, माटोळी, माटोळीला बांधण्यासाठी लागणारे लाकडी सामान, लाटफळे अशा अनेक लहान मोठ्या आकाराच्या वस्तू तयार केल्या जातात व फेरीमध्ये नेऊन विकल्या जातात.
काही जण चतुर्थी निमित्ताने गणपतीची मूर्ती पूजनासाठी नवीन पाट खरेदी करतात. हे पाट फणसाच्या लाकडा पासून तयार केले जातात, त्यावर चांदी बसवली जाते एका पाटाची किंमत आकारानुसार पाच हजार रुपये असते. त्याहून चांदीची किंमत मिळून एक पाट १० हजारांना पडतो.
यावर्षी प्रथमच पंकज चितारी, दुर्गेश चितारी नीलेश गोपाळ चितारी यांनी आपल्या घरांसमोर रस्त्याच्या बाजूला लाकडी वस्तूंची दुकाने थाटली आहेत.
दरवर्षी चतुर्थीनिमित्त सुमारे १ हजार मासोळी, ८ हजारांहून अधिक विविध आकाराचे लाकडी पाट, पाच ते सहा हजार आडोळी, लाटफळी विक्रीला जातात असे विजन च्यारी यांनी सांगितले.
चौकट
२० टक्केच खरेदी
गोवा बागायतदार संस्था दरवर्षी आमच्या कडून लाकडी सामान खरेदी करून विक्री करतात. मात्र यावर्षी त्यांनी केवळ दरवर्षी खरेदी करीत असलेल्या माला पैकी फक्त २० टक्के माल खरेदी केला. गोवा बागायतदार संस्थेने माल खरेदी केल्याने आम्हाला थोडा फार दिलासा मिळाला आहे, असे नीलेश चितारी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या